अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) आजकाल चांगलाच चर्चेत आहे. त्यांचा गोदावरी हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहातप्रकाशित होणार आहे. चित्रपटाची तारीख रिलीझ झाल्यानांतर आता प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . ज्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. गोदावरी नंदिच्या काठचा एक व्हिडीओ शेअर केल्यावर त्याने त्याचा दिवंगत मित्र आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जितेंद्र जोशीने त्यांचा हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे.” अशाप्रकारे त्याने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
त्याचा गोदावरी हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी रिलीझ होणार आहे. या चित्रपटात विक्रम विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव हे कलाकार असणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाची खूप चर्चा चालू आहे. चित्रपटाला रिलीझ होण्याआधीच काही राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.
हेही वाचा-
गुलजार यांना गॅरेजमध्ये काम करताना मिळाली बॉलिवूडमध्ये संधी, मेकॅनिक ते गीतकार असा आहे प्रवास
तो आला…त्याने गायले…आणि तो जिंकला, अमिताभ बच्चन यांच्या एका फोनने बदलवून टाकले दलेर मेहंदी यांचे संपूर्ण आयुष्य
‘या’ कॉमेडियनसोबत जोडले होते अरुणा इराणी यांचे नाव, बोलबाला होताच अभिनेत्रीने घेतलेली माघार