Tuesday, July 9, 2024

काळीज तोडणारी बातमी! ‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्रीचे २९ व्या वर्षी निधन; मागे सोडून गेली १ वर्षाचा मुलगा

टीव्ही इंडस्ट्रीतून वाईट बातमी समोर आली आहे. ‘जोधा अकबर’ या प्रसिद्ध मालिकेत ‘सलीमा बेगम’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मनीषा यादवचे शुक्रवारी (१ ऑक्टोबर) निधन झाले आहे. ती अवघ्या २९ वर्षांची होती. मनीषाच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तिच्या निधनाचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार, तिचे निधन ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

मनीषा यादवची सहअभिनेत्री परिधी शर्माने या दु:खद बातमीची माहिती दिली आहे. परिधीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर मनीषाचा फोटो शेअर करत लिहिले की, “ही बातमी हृदय तोडणारी आहे. मनीषाच्या आत्म्यास शांती लाभो.” (Jodha Akbar Fame Actress Manisha Yadav Passes Away)

परिधीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमचा शो ऑफ एअर झाल्यानंतर मी तिच्याशी सतत संपर्कात नव्हते. मात्र, आमचा एक व्हॉट्सऍप ग्रूप आहे, ज्याचे नाव मुगल आहे आणि यामध्ये त्या सर्व अभिनेत्री आहेत, ज्या बेगम बनल्या होत्या. या ग्रूपमार्फत आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो. कुणालाही कोणती माहिती शेअर करायची असेल, तर आम्ही या ग्रूपवर शेअर करायचो. काल मला या ग्रूपमार्फतच या बातमीबाबत समजले आणि मी हैराण झाले.”

मनीषाने मागील जुलैमध्ये आपल्या मुलाचा पहिलाच वाढदिवस साजरा केला होता. तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. मनीषाने लिहिले होते की, “पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या मुला. तू माझ्या आयुष्यातील कठीण काळातील एका प्रकाशाप्रमाणे आहेस. मी तुझी आई असल्याचा मला अभिमान आहे.”

याव्यतिरिक्त मनीषाने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. मनीषाने आतापर्यंत ‘ओरू कुप्पई कढाई’, ‘सांडीमुनी’, ‘पोट्टू’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

हे देखील वाचा