जोधा अकबर या चित्रपटात ऋतिक रोशन ने प्रेक्षकांची मने जिंकलीच मात्र छोट्या पडद्यावर विचार केला तर अभिनेता रजत टोकसने साकारलेल्या अकबरच्या भूमिकेचा प्रेक्षकांवर अधिक प्रभाव पडलेला दिसून येतो जोधा अकबर या टीव्ही सिरीयल मध्ये रजत टोकसने जलालुद्दीन मोहम्मद अकबर ची भूमिका ज्या पद्धतीने आणि ताकदीने साकारली की प्रेक्षक या अकबरच्या भूमिकेला विसरू शकले नाहीत.
जेव्हा जेव्हा एखाद्या ऐतिहासिक टीव्ही शोचा उल्लेख केला जातो तेव्हा रजत टोकसचे नाव स्वाभाविकपणे लक्षात येते. रजत टोकस हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. “धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान,” “जोधा अकबर,” आणि “चंद्रगुप्त मौर्य” यासारख्या ऐतिहासिक मालिकांमध्ये शक्तिशाली भूमिका साकारून त्याने स्वतःला सिद्ध केले. या पात्रांद्वारे त्याने इतिहासाला पडद्यावर जिवंत केले आहे.
रजत टोकसने अगदी लहान वयातच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २००५ मध्ये, त्याने “साई बाबा” या मालिकेत बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. त्यानंतर, २००६ मध्ये “धरती का वीर योधा पृथ्वीराज चौहान” या मालिकेत पृथ्वीराजची भूमिका साकारल्याने तो रातोरात स्टार बनला. अभिनेत्री परिधी शर्माने २०१३ ते २०१५ दरम्यान प्रसारित झालेल्या “जोधा अकबर” या लोकप्रिय मालिकेत रजत टोकससोबत जोधाबाईची भूमिका केली. या मालिकेने दोन्ही कलाकारांच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले. रजत आणि परिधीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली आणि या मालिकेने बराच काळ टीआरपी चार्टवर वर्चस्व गाजवले.
या मालिकेनंतर, रजत (Rajat)ऐतिहासिक भूमिकांसाठी विशेषतः ओळखला जाऊ लागला. त्याने अशा भूमिका साकारल्या आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत पाय रोवला. तथापि, जेव्हा त्याची कारकीर्द शिखरावर होती, तेव्हा तो हळूहळू छोट्या पडद्यापासून दूर गेला. २०१७ मध्ये “चंद्रगुप्त मौर्य” नंतर, तो शेवटचा लोकप्रिय मालिका “नागिन ३” मध्ये विक्रांतच्या भूमिकेत दिसला होता. २०१९ पासून, रजत टोकसने टेलिव्हिजनवरून ब्रेक घेतला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत आणि त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत.
रजत टोकस टेलिव्हिजनवर क्लिन-शेव्हन लूकमध्ये असाल्याने, मुली त्याच्या निरागसतेने मोहित होत असत, पण आता त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्याचे रूपांतर आश्चर्यकारक आहे. रजत टोकस आता लहान केस आणि लांब दाढीसह किलर दिसत आहे. त्याने फिटनेसकडे देखील विशेष लक्ष दिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


