बिग बॉस फेम गोहर खानच्या डान्सचा जलवा, व्हि़डीओ पाहून चाहते घायाळ


बिग बॉस फेम गोहर खान आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या सोबत जोडून ठेवते. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असते.

नुकताच गोहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती तिचा पती ‘जैद दरबार’ याच्यासोबत डान्स करणार दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच धमाल करत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये ते दोघेही बी. प्राक यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या डान्स व्हिडीओमध्ये दोघेही खूप स्टायलिश दिसत आहेत. यात गोहर खानने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे, तर जैद दरबारने ऑफ व्हाईट कलरचा पायजमा आणि कुर्ता घातला आहे. दोघेही एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. या व्हिडीओला आतपर्यंत 1 लाखापेक्षाही जास्त व्यूज मिळाले आहेत.

गोहर खान शेवटची ‘तांडव’ या वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तांडव या वेबसीरिज मधूनच तिने वेबसीरिजमध्ये पदार्पण केले होते. या वेबसीरिजमध्ये तिच्यासोबत सैफ अली खान हा मुख्य भूमिकेत होता. यासोबतच गोहर खान ही बिग बॉस 14 मध्ये देखील स्पर्धक होती.


Leave A Reply

Your email address will not be published.