‘ही’ बॉलिवूड मंडळी आहे जॉन अब्राहमची कट्टर दुश्मन, एकाने तर केलाय करिअर संपवण्याचा प्रयत्न

बॉलिवूडचा सुपरहॉट अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने स्व:बळावर नाव कमावले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील जॉनने आपल्या किलर लूकने आणि दमदार बॉडीने चाहत्यांची मने जिंकली आहे. त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धमाल करतात. जॉन अब्राहम अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे आणि यादरम्यान त्याची अनेक लोकांशी मैत्री झाली, तर काही लोक त्याचे शत्रूही बनले. तर आज या लेखात आपण पाहुयात की, कोण कोण आहेत त्याचे इंडस्ट्रीतील शत्रू!

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

सलमान खान
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि जॉन अब्राहम यांच्यातील वैर जगप्रसिद्ध आहे. जॉनच्या एका चित्रपटातून कॅटरिनाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला, त्यानंतर सलमान आणि जॉन यांच्यात वैर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षे उलटून गेली, तरी या दोघांची मैत्री होऊ शकली नाही.  (John Abraham enemies in bollywood)

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अक्षय कुमार
जॉनने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) अनेक चित्रपट केले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा दोघे चांगले मित्र म्हणून ओळखले जात होते. पण एक वेळ अशीही आली की, त्यांच्यात वैर झाले. या शत्रुत्वाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या संघर्षाने झाली, त्यानंतर दोघे पूर्वीसारखे नाते निर्माण करू शकले नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बिपाशा बासू
जॉन अब्राहम एकेकाळी अभिनेत्री बिपाशा बासूच्या (Bipasha Basu) प्रेमात पडला होता. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातीच्या काळात बिपाशा या नात्यात प्रामाणिक होती, पण काही काळानंतर तिने जॉनला फसवायला सुरुवात केली. यानंतर जॉन अब्राहमने कधीही बिपाशाकडे मागे वळून पाहिले नाही आणि आयुष्यात पुढे गेला.

View this post on Instagram

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

कॅटरिना कैफ
अभिनेत्री कॅटरिना कैफने (Katrina Kaif) सुरुवातीच्या काळात जॉन अब्राहमच्या विरोधात सलमान खानचे कान भरले होते. कॅटरिनाच्या अशा वागण्याने जॉनचे मन दुखावले गेले. यानंतर कॅटरिना आणि जॉनमध्ये असा दुरावा निर्माण झाला की, हे लोक पुन्हा कधीच मित्र होऊ शकत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

डिनो मोरिया
जॉन अब्राहमने बिपाशाला डेट करायला सुरुवात केली, तेव्हा डिनो मोरिया (Dino Morea) तिचा बॉयफ्रेंड होता. तेव्हा बिपाशाने डिनोला सोडून जॉनला डेट करायला सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Dino Morea (@thedinomorea)

यामुळे जॉन आणि डिनो यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले, जे वर्षानुवर्षे तसेच राहिले.

हेही वाचा :

Latest Post