बॉलिवूडचा ऍक्शन हिरो जॉन अब्राहम त्याच्या फिट बॉडीसाठी ओळखला जातो. त्याची बॉडी पाहून प्रत्येकजण त्याचे कौतुक करत असतो. चित्रपट असो किंवा सोशल मीडिया, जॉन आपली बोल्ड स्टाईल कुठेही दाखविण्यात मागेपुढे पाहत नाही. याशिवाय तो त्याच्या प्रेमळ स्वभावासाठीही खास ओळखला जातो.
सोशल मीडियावर जॉन अब्राहमचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जॉन एका बसचालकासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला आहे. बसचालकासोबत त्याची प्रेमळ वागणूक पाहून जो तो त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्याता हा प्रेमळ अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे.
खरं तर हा व्हिडिओ व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्याची वर्तणूक पाहून युजर त्याचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी काही युजर त्याला ट्रोल करतानाही दिसले. ट्रोल करण्यामागचे कारण म्हणजे, फोटोसाठी पोज देताना जॉनने तोंडाचे मास्क काढले होते. तसेच बसचालकानेही त्याच्या तोंडावरचे मास्क काढलेले पाहायला मिळाले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जॉनचे अत्यंत मनोरंजक चित्रपट रांगेतच आहेत. लवकरच तो दिव्या खोसला कुमारसोबत ‘सत्यमेव जयते २’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने रिलीझ करण्यात येणार आहे. हा बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ सह रिलीझ होणार आहे.
याशिवाय त्याच्याकडे सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ चित्रपट देखील आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तो मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात सह-कलाकार अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्यासोबतही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला










