Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रियांकाच्या हाती लागला अजून एक मोठा हॉलिवूड सिनेमा, ‘या’ स्टारसोबत झळकणार मुख्य भूमिकेत

प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडसोबतच बॉलिवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. तिची आगामी ‘सिटाडेल’ ही सिरीज लवकरच प्रदर्शित होत असून, ती सध्या या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासोबतच तिने बॉलिवूडबद्दल केलेल्या व्यक्तव्यामुळे देखील ती कमालीची चर्चेत आहे. ग्लोबल स्टार झालेल्या प्रियांकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे लवकरच ती एका मोठ्या स्टारसोबत एका सिनेमात दिसणार आहे. प्रियांका लवकरच डब्लूडब्लूइ स्टार असलेल्या जॉन सीनासोबत ‘हेड्स ऑफ स्टेट’ सिनेमात दिसणार आहे. याचा सर्वानाच आनंद झाला असून, जॉन सीनाने देखील त्याचा आनंद ट्विट करत व्यक्त केला.

जॉन सीनाने ट्विट करत ‘हेड्स ऑफ स्टेट’ या सिनेमाबद्दल त्याचा आनंद व्यक्त करत आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “अशा स्वप्नवत टीमला जमवण्यासाठी अमेझन स्टुडिओला धन्यवाद. मी इद्रिस एल्बासोबत ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे आणि मी आमच्या टीममधील नवीन सदस्य असलेल्या विश्वप्रसिद्ध अशा प्रियांका चोप्राचे स्वागत करतो.”

जॉन सीनाने केलेल्या या ट्विटनंतर आणि प्रियांकाच्या स्वागतनानंतर प्रियंकाने देखील त्याला संबोधन एक ट्विट केले आहे. त्यात तिने लिहिले, “मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी धन्यवाद. मी सेटवर येण्यासाठी खूपच उत्सुक आहे. चल निघूया.” प्रियांकाचे हे ट्विट सध्या खूपच व्हायरल होत आहे. या दोन्ही ट्विट वर त्यांच्या फॅन्सने कमेंट्स करत दोघं सुपरस्टारला एकत्र बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

दरम्यान ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये प्रियांका चोप्रा आणि जॉन सीनासोबत इद्रिस एल्बा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग पुढच्या महिन्यापासून सुरु होत आहे. सध्या प्रियांका तिच्या आगामी ‘सिटाडेल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, याचा पहिला भाग २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा