Tuesday, October 14, 2025
Home हॉलीवूड एम्बर हर्डच्या विरोधात केस जिंकल्यानंतर जॉनी डेपने केली टिक टॉकवर ग्रँड एन्ट्री शेअर केला व्हिडिओ

एम्बर हर्डच्या विरोधात केस जिंकल्यानंतर जॉनी डेपने केली टिक टॉकवर ग्रँड एन्ट्री शेअर केला व्हिडिओ

हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध अभिनेता असलेला जॉनी डेप महिला बऱ्याच काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे संपूर्ण जगात कमालीचा गाजताना दिसत आहे. तो आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी असणाऱ्या एम्बर हर्ड यांच्यामध्ये चालणाऱ्या मानहानीचा केसमुळे हे दोघं देश परदेशात चांगलेच गाजत आहे. एम्बर हर्ड कडून कोर्टात अनेक पुरावे आणि दलीले सादर केल्यानंतरही कोर्टाने जॉनीला निर्दोष घोषित केले. या निर्णयामुळे त्याच्या फॅन्समध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. ते सर्वच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा आनंद व्यक्त करत आहे. जॉनी सध्या त्याच्या फॅन्सनी त्याला दिलेल्या पाठिंब्याला धन्यवाद म्हणताना दिसत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना धन्यवाद म्हणणारा व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

जॉनी डेप सध्या एम्बर हर्ड सोबत झालेल्या कायद्याच्या लढाईनंतर सेलिब्रेशनचा मूडमध्ये आहे. आपला आनंद व्यक्त करताना जॉनी सोशल मीडियाचा आनंद घेत आहे. नुकताच जॉनी त्याची हाय प्रोफाईल केस जिंकल्यानंतर भारतीय रेस्टोरंटमध्ये गेला होता. जिथे त्याने तब्बल ४८ लाख रुपये खर्च केले. आता जॉनी टिक टॉक वर देखील आला आहे. यावर ताईने टायचा चाहत्यांना धन्यवाद म्हणणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो टिक टॉकवर आल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी काळात त्यांचे ४ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले आहेत.

टिक टॉकवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या सर्वात किंमती, प्रामाणिक अशा चाहत्यांसाठी. आम्ही सर्वच ठिकाणी सोबत होतो, आम्ही सर्व काही सोबतच पाहिले. आम्ही सर्वच सोबतच एकाच रस्त्यावर चाललो. आम्ही एक साथ बरोबर काम केले. कारण तुम्हाला माझी पर्वा आहे. आता आम्ही सर्व एकत्रच सोबत पुढे जाऊ. तुम्ही नेहमीसारखेच माझ्यासोबत आहात आणि पुन्हा एकदा सर्वाना धन्यवाद. माझे तुमच्यावर खूप प्रेम असून मी तुमच्या सर्वांचा सन्मान करतो.” तत्पूर्वी दोन्ही पक्षांची दलीले ऐकून कोर्टाने जॉनीला निर्दोष सांगत एम्बर हर्डच्या विरोधात निर्णय दिला. सोबतच एम्बर हर्डवर १५ मिलियन डॉलरचा दंड लावला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा