Saturday, June 29, 2024

‘माझ्यामुळे मुख्य कलाकाराला…’, म्हणत जॉनी लिव्हर यांनी सांगितले चित्रपटात कमी दिसण्याचे कारण

बॉलिवूडमध्ये नेहमीच चढत्या सूर्याला नमस्कार केला जातो. त्यामुळे काही कलाकार त्यांची या क्षेत्रातून ब्रेक घायची वेळ ओळखता आणि थांबता. मात्र काही कलाकार फ्लॉप ठरायला अथवा मागे पडायला लागले की ते हळूहळू चित्रपटांमधून दिसेनासा होतात. मागील काही काळापासून दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे जॉनी लिव्हर चित्रपटांमध्ये खूपच कमी दिसत आहे. काही मोजक्या चित्रपटांमध्ये ते काम करताना दिसतात. मात्र पूर्वी इतके सातत्याने त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले की त्यांना काम मिळणे कमी झाले आहे, याबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी त्यांचे मत मांडले.

बॉलिवूडच्या १९८० च्या दशकात जॉनी लिव्हर हे एकमेव असे कॉमेडी कलाकार होते, ज्यांचे एका वर्षांत डझनभर सिनेमे यायचे. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांचे सिनेमे कमी होऊ लागले आहे. आता ते दोन तीन चित्रपटांमध्येच दिसतात. कॉमेडी किंग म्हणून जॉनी यांना ओळखले जाते. मागच्या वर्षी तर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ सिनेमात दिसले. हा सिनेमात फ्लॉप ठरला. मुलाखतीमध्ये जॉनी म्हणाले, “मला जास्त काम मिळत नाही. आता खूप कमी कॉमेडी सिनेमे तयार होतात. तर दुसरीकडे चित्रपटांमधील मुख्य कलाकार सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे, प्रेजेंसमुळे इतरांना धोका निर्माण करत आहे. फायनल कटमध्ये त्यांचा भाग कट केला जातो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Johny Lever (@iam_johnylever)

पुढे ते म्हणाले, “कधी कधी तर मुख्य कलाकाराला भीती वाटते आणि तो माझे सीन्स एडिट करायला लावतो. ते बघतात की प्रेक्षक माझ्या सीन्सवर कसे व्यक्त होतात. त्यामुळे त्यांना भीती वाटते. असुरक्षितता जाणवते. लेखकांना देखील त्यांच्यासाठी कॉमेडी सीन्स लिहायला सांगितले जाते. लेखकांनी देखील कॉमेडी सीन्सला विभागून टाकले. त्यातच माझ्या भूमिका छोट्या छोट्या झाल्या. मी आता जास्त काम करत नाही. मी जेव्हा जास्त काम करायचो तेव्हा कॉमेडीला खूप महतव होते, आदर होता. मात्र आता असे नाही.”

तत्पूर्वी जॉनी लिव्हर यांनी जवळपास ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून देखील काम केले. ते एक उत्तम मिमिक्री कलाकार आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका आजही लोकांना लक्षात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे

 

हे देखील वाचा