Saturday, June 29, 2024

जेमी लिव्हरने शेअर केला वडील जॉनी लिव्हरसोबतचा मजेशीर व्हिडिओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

बॉलिवूडमधील सर्वात टॉपच्या कॉमेडी कलाकारांचे नाव घ्यायचे म्हटले, तर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांचे नाव या यादीत सर्वात वरच्या स्थानी येते. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. जेमी देखील तिच्या विनोदी अभिनयाने सर्वांच्या मनात त्याची जागा बनवत आहे. या बाप- लेकीची जोडी सोशल मीडियावर त्यांचे विनोदी व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांचे हे व्हिडिओ खूप चर्चेत असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यासोबत अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा व्हिडिओ एक थ्रोबॅक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जेमी तिच्या वडिलांनी निभावलेले छोटा छतरी हे पात्र कॉपी करत आहे. या व्हिडिओला आणखी खास बनवण्यासाठी जॉनी लिव्हरने माननी देखील त्याच्या मुलीला साथ दिली आहे. ते या व्हिडिओमध्ये परेश रावल यांचा अभिनय करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “मी या व्हिडिओला कसे पोस्ट केले आहे, हे मला माहित आहे. मी पहिल्यांदा माझे वडील द ग्रेटेस्ट मॅन जॉनी लिव्हर यांचे डायलॉग लिपसिंग केले आहेत. मला आठवतंय त्यांनी मला सांगितले होते की, ते बापूच्या डायलॉगवर लिपसिंग करतील आणि मी त्यांच्या. काहीतरी हटके झालेच पाहिजे ना.”

जॉनी आणि जेमी यांनी केलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांचे चाहते काय तर अनेक कलाकार देखील त्यांच्या या व्हिडिओला कमेंट करून त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. या आधी त्यांचा ‘डोन्ट टच मी’ या गाण्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडिओ कोरोना विषाणूची माहिती देणारा होता. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी कोरोना विषाणूचा फैलाव दाखवून दिला होता. या सोबतच त्याने लिहिले होते की, ‘लस घेईपर्यंत डोन्ट टच मी.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने समुद्रकिनारी केला ‘अब के बरस’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही भलतेच खुश

-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

हे देखील वाचा