Monday, July 1, 2024

काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात

मधल्या काही काळामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांनी कडवी टक्कर देत कमाई आणि लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. चित्रपटांना संपूर्ण देशातून मिळणारे प्रेम थक्क करणारे आहे. या चित्रपटांमुळे यात काम करणाऱ्या कलाकारांना देखील जागतिक ओळख मिळण्यास सुरुवात झाली. अशात आज म्हणजेच शनिवारी (दि. 20 मे)ला  जुनियर एनटीआर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या आयुष्यातील रंजक किस्सा…

या सिनेमातील त्याचा अभिनय आणि डान्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, एनटीआरच्या करिअरमधील हा सर्वात मोठा आणि भव्य सिनेमा मानला जात आहे. एनटीआरने त्याच्या करिअरमध्ये अमाप यश मिळवले आहे. लहानपानपासून अभिनयात सक्रिय असणाऱ्या एनटीआरच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. (jr ntr marrige shocking facts legal trouble before marriage)

एनटीआर त्याचे जीवन अतिशय सामान्य पद्धतीने जगतो. त्याला कोणत्याही प्रकारची शोबाजी आवडत नाही. एनटीआरच्या पत्नीचे नाव लक्ष्मी प्रनथी असून, त्याला दोन मुलं आहेत. एनटीआर आणि लक्ष्मी यांचे अरेंज मॅरेज असून, त्यांचे लग्न 5 मे 2011साली हैद्राबादमध्ये झाले. त्यांचे लग्न अतिशय भव्य आणि लक्षवेधी होते. एनटीआर आणि लक्ष्मी यांच्या लग्नाचे प्रसारण तिथल्या प्रादेशिक चॅनेलवरून लाईव्ह प्रसारित केले गेले होते. या लग्नामध्ये तब्ब्ल 10 हजार पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. एनटीआरचे वडील असलेल्या नंदमुरी हरिकृष्णा यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न्नत 18 कोटींपेक्षा अधिक खर्च केला होता.

लक्ष्मी प्रनथी ही प्रसिद्ध उद्योजक नरेन श्रीनिवास राव यांची मुलगी असून, राजकीय नेते असलेल्या चंद्राबाबू नायडू यांची ती भाची आहे. चंद्राबाबू नायडू हे एनटीआर काका असल्याने त्यांनीच हे लग्न जमवले होते. या लग्नाच्या वेळी लक्ष्मी केवळ 18 वर्षांची होती. खूपच कमी लोकांना माहित असेल की, या लग्नाच्या आधी एनटीआरवर केस दाखल करण्यात आली होती, त्यामुळे हे लग्न देखील पुढे ढकलले गेले. एनटीआरला 2010सालीचं लक्ष्मीसोबत लग्न करायचे होते, मात्र तेव्हा ती नाबालिक होती तिचे वय केवळ 17 वर्ष होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एका वकिलाने बालविवाह कायद्याअंतर्गत त्याच्यावर केस टाकली.

त्यामुळे एनटीआरला लग्न करण्यासाठी एक वर्ष थांबावे लागले आणि त्यांनी लक्ष्मी 18 वर्षाची झाल्यानंतर 2011साली लग्न केले. एनटीआर हा तेलगू इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेता असून तो उत्तम गायक देखील आहे. त्याने त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकले असून, त्याचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्याच्या लूकची युजर्सने उडवली खिल्ली, ‘काेई मिल गया’च्या जादूशी केली तुलना

हे देखील वाचा