Thursday, July 18, 2024

जुनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनिथी आहे अतिशय सुंदर, मोठंमोठ्या अभिनेत्रींना देखील देते टक्कर

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’. सिनेमाचा प्रदर्शनाच्या आधीपासूनच्या विविध कारणांमुळे सतत चर्चेत होता. जानेवारी महिन्या प्रदर्शित होणार हा सिनेमा कोरोनामुळे पुढे ढकलला गेला तेव्हा सिनेमाप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला मात्र आता या सिनेमाने जी काय धमाल केली ती पाहून मागील सर्वच गोष्टी प्रेक्षक विसरले आहेत. या सिनेमाच्या कमाईने तर सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले आहे. जुनियर एनटीआर आणि रामचरण यांची भूमिका असलेल्या या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या मोठमोठ्या सिनेमांना देखील मागे टाकले आहे.

या सिनेमाचे यश पाहून मुंबईमध्ये सिनेमाच्या अनेक सक्सेस पार्टी होण्याचे सत्र सुरु आहे. नुकतीच या सिनेमाची एका पार्टी मुंबईमध्ये संपन्न झाली. या पार्टीला आरआरआर सिनेमाच्या संपूर्ण टीमसह बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. या पार्टीच्या वेळी खास आकर्षण ठरली ती जुनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनिथी. जेव्हा लक्ष्मी प्रनिथी या पार्टीमध्ये आली तेव्हा संपूर्ण मीडियाचे कॅमेरे तिच्याकडे रोखले गेले. लक्ष्मी प्रनिथीच्या अतिशय सध्या, सुंदर एंत्रीमुळे ती या पार्टीमध्ये चांगलीच गाजली.

रॉयल ब्लु रंगाचा ड्रेस घातलेल्या लक्ष्मी प्रनिथीसोबत जुनियर एनटीआर खूपच छान दिसत होता. या दोघांच्या जोडीने चांगलेच लाईमलाइट मिळवले. जुनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रनिथी ही साऊथमध्ये चांगलीच गाजणारी जोडी आहे. या जोडीचे असंख्य चाहते असून सतत या जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. लक्ष्मी प्रनिथीही या ग्लॅमर जगातील चकाचोंधपासून नेहमीच लांब राहत तिचे साधे जीवन जगत असते. लक्ष्मी प्रनिथी ही वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते.

लक्ष्मी प्रनिथी ही खूपच खासगी व्यक्ती असून ती सोशल मीडियावरही जास्त सक्रिय दिसत नाही. तिने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट खासगी केले आहे. मात्र जेव्हा जेव्हा लक्ष्मी प्रनिथी तिचे फोटो शेअर करते तेव्हा ती नेहमीच लोकांच्या कौतुकास पात्र ठरते. काही दिवसांपूर्वीच तिला आरआरआर सिनेमाच्या स्क्रीनिंग वेळी तिला स्पॉट करण्यात आले होते तेव्हा तिने आरआरआर सिनेमाचा लोगो असलेल्या टीशर्ट घातला होता तर त्यावर पिंक शोल्डर बॅग देखील घेतली होती. तत्पूर्वी जुनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रनिथी यांचे लग्न २०११ साली झाले असून त्यांना दोन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा