मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता असलेल्या अपारशक्ती खुराणाने त्याच्या अभिनयाच्या आणि विनोदशक्तीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्यमान खुराणाचा भाऊ असलेल्या अपारशक्तीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच त्याची ‘जुबली’ ही सिरीज प्रदर्शित झाली. यात तो बिनोद दास उर्फ मदन कुमार ही भूमिका साकारत आहे. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली आहे. आज अपारशक्तीला एक वेगळी ओळख आणि लोकप्रियता आहे, मात्र एक काळ असा होता जेव्हा त्याला या क्षेत्रात टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
अपारशक्तीने या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या करियर संदर्भात मिळालेल्या एका वाईट सल्ल्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, “मी कोणासोबत चर्चा करत होतो, की जीवनात पुढे कसे जावे? त्यावर त्या व्यक्तीने सांगितले, खूप कठीण असणार आहे तुझ्यासाठी. मी त्याला विचारले का? तो म्हणाला की माझ्याशी संपर्क केला जाऊ शकतो. सोबतच त्याने मला लोकांशी न बोलण्याचा सल्ला दिला. मी घरी गेलो आणि थोडा रडलो कारण मला वाटले हाच माझ्या जीवनाचा प्लस पॉइंट आहे. मी भावनिक आहे. मी असा व्यक्ती नाही जो कोणत्याही चर्चेत फक्त फिजिकली हजर असेल. मला प्रत्येक ठिकाणी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही रूपाने हजर राहायला आवडते.”
पुढे अपारशक्ती म्हणाला, “जर मी कोणासोबत बसलो असेल. तर त्या वेळेसाठी माझ्याकरता ती चर्चा सर्वात महत्वाची असते. मी अगदी माझ्या सेक्युरिटी गार्डशी पण त्याचा प्रेमाने आणि मनाने बोलतो. माझ्यासाठी ती व्यक्ती चांगली आणि तिचे मन उत्तम पाहिजे हेच महत्वाचे असते.” दरम्यान अपारशक्तीचा ‘जुबली’ हा एक पिरियड ड्रामा आहे. जो हिंदी सिनेसृष्टीच्या 1940-50 च्या दशक आधारित आहे. प्रोसेनजीत चटर्जी, सिद्धांत गुप्ता, वामिका गब्बी, राम कपूर आणि श्वेता बसु प्रसाद आदी कलाकार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…