Friday, July 5, 2024

या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ होणार आणखीनच खास, नवीन रोमँटिक गाणे येणार प्रेमवीरांच्या भेटीला

सध्या संगीत क्षेत्रात रोज नवनवीन गाणी प्रदर्शित होत असतात. अनेक गाण्यांचे व्हिडिओ अल्बमही प्रदर्शित होत असतात. यामध्ये चाहत्यांना आवडणार्‍या सुंदर सुंदर गाण्यांची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे याच याच पार्श्वभूमीवर आणखी एक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटातील प्रमुख संगीतकार या गाण्यासाठी आवाज देणार आहेत. सध्या या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

तुलसी कुमार लवकरच भूषण कुमार यांच्या टी-सीरीज निर्मित ‘तुमसे प्यार करके’ या नवीन गाण्यासह तुमच्या लहानपणीच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तुलसी कुमार आणि जुबिन नौटियाल हे लोकप्रिय गायक या प्रेमगीतासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. या ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने तुलसी आपल्या चाहत्यांसाठी एक प्रेमगीत घेऊन येत आहेत जे कुणाल वर्मा यांनी लिहिले आहे. तसेच हे सुंदर गाणे पायल देव यांनी संगीतबद्ध केले आहे.

या गाण्याविषयी बोलताना तुलसी कुमार म्हणतात की, ”फेब्रुवारी हा खऱ्या अर्थाने प्रेमाचा महिना आहे आणि व्हॅलेंटाईन डे सुद्धा येणार आहे’. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी हे एक अतिशय सुंदर, साधे आणि मधुर गाणे आहे.”
टी-सीरीज निर्मित ‘तुमसे प्यार करके’ हे गाणे तुलसी कुमार आणि जुबिन नौटियाल यांनी गायले आहे. नवजीत बटर दिग्दर्शित या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये गुरमीत चौधरी आणि इहाना ढिल्लो दिसणार आहेत. हे गाणे 1 फेब्रुवारी रोजी टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, गुरमीत हा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे आणि आता तो चित्रपटांमध्येही झळकत आहे. गुरमीतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. ‘ये मेरी लाइफ है’ या कार्यक्रमात तो पहिल्यांदा दिसला होता. यासोबतच तो ‘कुमकुम एक प्यारा सा बंधन’ मध्येही दिसला होता. रामायणमध्ये मुख्य अभिनेता म्हणून ही त्याने काम केले आणि या शोमध्ये देबिना मुख्य भूमिकेत होती. इथूनच दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले त्यानंतर दोघांनी लग्न केले.

यानंतर तो ‘गीत हुई सबसे पराई’, पुविवाह यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला आहे. गुरमीतने टीव्ही शोमधून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, 2016 नंतर तो टीव्ही क्षेत्रापासून लांब गेला. गुरमीतने 2015 मध्ये ‘खामोशियां’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ‘ मिस्टर एक्स’,” ‘वजह तुम हो’ , ‘लाली की शादी में लड्डू दिवाना है’ अशा लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा