Wednesday, June 26, 2024

‘जुग जुग जिओ’ने दुसऱ्या दिवशी किती कोटी छापले? जाणून घ्या एका क्लिकवर

पहिल्या दिवशी ठीक-ठाक कमाई करणारा ‘जुग जुग जिओ‘ हा सिनेमा दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई करण्यात यशस्वी ठरला. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. २५ जून) या सिनेमाच्या कमाईत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अशात रविवारी (दि. २६ जून) देखील या सिनेमाकडून चांगली कमाई करण्याची अपेक्षा आहे.

‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) या सिनेमाने पहिल्या दिवशी ९ कोटी २८ लाख रुपयांची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी आता सिनेमाने जवळपास १२ कोटी ५५ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारतात ३४६५ हून अधिक स्क्रीन्सवर आणि परदेशात १०१४ स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या कमाईची टक्केवारी दुसऱ्या दिवशी कमालीची वाढली आहे.

दोन दिवसात किती कमावले?
‘जुग जुग जिओ’ सिनेमाने पहिल्या दिवशी कमावलेले ९.२८ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी कमावलेले १२ कोटी रुपये, यामुळे आता या सिनेमाने दोन दिवसात एकूण २१.८३ कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता निर्मात्यांना रविवारीदेखील चागंली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. निर्मात्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, सिनेमा पहिल्या वीकेंडला ३० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करण्यात यशस्वी राहील.

काय आहे सिनेमाची कहाणी?
‘जुग जुग जिओ’ सिनेमाची कौटुंबिक कहाणी आहे. सिनेमाची कहाणी एका अशा मुलावर आहे, जो लग्नानंतर खुश नाहीये आणि त्याला घटस्फोट हवा असतो. त्यामुळे तो वडिलांना सांगण्यास कचरत आहे. मात्र, नंतर त्याला समजते की, त्याचे वडीलदेखील त्याच वाटेवर असतात.

कौटुंबिक मनोरंजन सिनेमा आहे ‘जुग जुग जिओ’
शुक्रवारी (२४ जून) रोजी प्रदर्शित झालेला ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा कौटुंबिक मनोरंजनाचा आहे. या सिनेमात वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल आणि प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी हीदेखील आहे. प्राजक्ताने या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले आहे.

हे देखील वाचा