Monday, July 1, 2024

‘या’ व्यक्तीची दुसरी पत्नी बनली जुही चावला? अनेक वर्षांनी केला लग्न लपवण्यामागचा खुलासा

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे जुही चावला. अभिनेत्री सोमवारी(13 नोव्हेंबर) 56 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी अंबाला येथे झाला. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली जुही बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ती आता चित्रपटांपेक्षा, तिच्या शेतीवर जास्त लक्ष देत आहे.

जुहीच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले, तर ती खूप रोचक आहे. जुहीचे लग्न एका विवाहित पुरुषाशी झाले आहे. तिच्या पतीचे नाव जय मेहता आहे. मात्र, जुही जेव्हा पहिल्यांदा जयला भेटली तेव्हा त्यांची पत्नी सुजाता बिर्ला यांचे निधन झाले होते. सुजाता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतरच जुही आणि जय यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. महत्वाचे म्हणजे, जुहीने तिचे लग्न खूप दिवसांपासून सर्वांपासून लपून ठेवले होते. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात… (juhi chawla birthday bollywood actress some unknown facts)

जेव्हा जुही चित्रपट व्यवसायामध्ये सक्रिय होती, तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि उद्योगपती जय मेहता यांची चांगली मैत्री होती. शूटिंगदरम्यानच राकेश यांनी जुही आणि जयची भेट करून दिली होती. शूटिंगदरम्यान जुही-जय अनेकवेळा भेटले. मात्र, दोघांनीही एकमेकांबद्दल फारसा रस दाखवला नाही. पण, जयच्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे जुहीला समजल्यावर तिची वागणूक बदलली.

दोघांनी जेव्हा लग्नाचा विचार केला, तेव्हा काही दिवसांतच जुहीच्या आईचा एका कार अपघातात मृत्यू झाला. जुहीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जयने खूप मदत केली. अखेर जुहीने 1995 मध्ये जय मेहताशी लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत.

जुहीचे पती जय मेहता हे मेहता ग्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या दोन सिमेंट कंपन्याही आहेत. शाहरुख खानसोबत ते आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे सहमालक देखील आहेत.

महत्वाचे म्हणजे, जुही चावलाने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नाची बाब तिने बराच काळ लपून ठेवली. त्यानंतर एका मुलाखतीत जुहीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही सांगितले होते. मुलाखतीदरम्यान जूही म्हणाली होती की, “त्यावेळी मी माझ्या करिअरच्या शिखरावर होते आणि करिअरबद्दल खूप घाबरले होते. त्या काळात मला अनेक गोष्टींमध्ये यश मिळत होते. मला माझं करिअर सुरू ठेवायचं होतं आणि त्याच दरम्यान हे सगळं घडलं. मी याबद्दल कोणाला काही सांगितले नाही आणि माझे काम करत राहिले.”

जुही चावलाने तिच्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये आलेल्या ‘सल्तनत’ चित्रपटातून केली होती. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. यानंतर ती 1988 मध्ये ‘कयामत से कयामत’ तक या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

जूही चावलाने ‘स्वर्ग’, ‘प्रतिबंध’, ‘बोल राधा बोल’, :राजू बन गया जेंटलमॅन’, ‘लुटैरे’, ‘आइना’, ‘हम है राही प्यार के’, ‘अंदाज’, ‘लोफर’, ‘डर’, ‘इश्क’, ‘येस बॉस’, ‘दीवाना मस्ताना’, ‘अर्जुन पंडित’, ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’, ‘पहेली’ अशा चित्रपटांत काम केले आहे. (juhi chawla birthday bollywood actress some unknown facts)

हे देखील वाचा