Saturday, July 6, 2024

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी जुही चावलाने घेतला सुवासिनीचा ‘हा’ दागिना घालण्याचा निर्णय

आपण अनेकदा असे म्हणतो की, बॉलिवूडमुळे आपल्या देशात मॉडर्न विचार आणि संस्कृती आली. काही अंशी हे खरे असले तरी या क्षेत्रातील काही अभिनेत्रींनी त्यांची मूळ स्मरणात ठेवली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुवासिनींच्या अनेक परंपरा प्रचलित आहेत. मात्र आजच्या मॉडर्न जगात मुलींना त्या पाळायला कमीपणा वाटतो. सुवासिनीच्या रोज घालण्याच्या प्रत्येक गोष्टी मागे एक तर्क आहे, एक शास्त्र आहे. पण आपण त्याबद्दल अजूनही अनभिज्ञ आहोत. मात्र सिनेसृष्टीला एका मोठ्या अभिनेत्रीने या परंपरा उशिरा का होईना पण पाळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तिने याबद्दल माहिती देत एक पोस्ट शेअर केली.

जुही चावला ही ९० च्या दशकातील टॉपची अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. तिने तिच्या करियरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तिच्या पिढीतील सर्वच सुपरस्टार कलाकारांसोबत ती झळकली. जुही आजही बॉलिवूडमध्ये आणि तिच्या इतर उद्योगांमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जुही चावलाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती सध्या खूप चर्चेमध्ये आली आहे. जुहीने तिच्या पायांचा फोटो शेअर केला असून, तिने तिच्या पायामधे जोडवे घातले आहे. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, “आपल्या जुन्या मुळांकडे जात आहे… प्राचीन परंपरा जोडवे… हार्मोनचे संतुलन, पूर्ण दिवसाचे ऍक्युप्रेशर, एकदाच घालणे, कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचा प्रयोग नाही आणि आयुष्यभराची ग्यारंटी… एक समजुदार भारतीय.” तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तिच्या या विचारांचे स्वागत केले आहे.

तत्पूर्वी जुही चावलाने १९९५ साली उद्योजक जय मेहतासोबत लग्न केले. तिला आणि जयला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुलं असून, जुहीने लग्नानंतर तब्बल पाच वर्ष तिच्या लग्न झाल्याचे जगापासून लपवले होते. लग्नामुळे करियर खराब होण्याची भीती तिच्या मनात असल्याने तिने ही बाब लपवली होती. तिच्या या लग्नाबद्दल खूपच जवळच्या लोकांना माहित होते. जुही सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना आणि पार्ट्याना दिसत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॉट! मालदीवच्या समुद्रावर फुलल तुलसी कुमारचं सौंदर्य
‘तुम्ही भारताला….’, आरआरआर चित्रपटाच्या गोल्डन यशावर नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

हे देखील वाचा