प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर वडील झाला आहे. त्याची पत्नी हेली बीबरने एका मुलाला जन्म दिला असून, बाळाचा एक फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या खास प्रसंगी, जस्टिन बीबरशी संबंधित एक जुनी गोष्ट समोर येतेय ज्यामध्ये तो मुले होण्याच्या मुद्द्यावर बोलला होता.
२०१८ ची गोष्ट आहे. जस्टिन बीबर ‘द एलेन डीजेनेरस शो’मध्ये दिसला होता. यावेळी त्याने सांगितले होते की, पत्नी हेलीला जितकी मुले हवी आहेत तितकीच मुलं त्यांना होतील. हा निर्णय तीच्यावर सोपवायचा आहे. आफ्टर ऑल बॉडी सुद्धा हेलीचीच आहे, असा त्याचा आग्रह होता.
जस्टिनने याच शोमध्ये म्हटले होते की, त्याला असे वाटते की एक महिला म्हणून हेलीला सध्या काही गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि असे दिसते की ती मुले होऊ देण्यास तयार नाही. जस्टिन बीबर आणि हेलीने सप्टेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. बीबरने या वर्षी मे महिन्यात सांगितले होते की तो आणि हेली पालक होणार आहेत.
जस्टिनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या त्याच्या बाळाच्या फोटोमध्ये बाळाचा छोटा पाय दिसत आहे. हा सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना जस्टिनने मुलाचे नावही सांगितले. मुलाचे घरात स्वागत करताना त्याने सांगितले की, मुलाचे नाव जॅक ब्लूज बीबर आहे.
जॅक ब्लूज बीबरच्या जन्मानंतर जस्टिन आणि हेलीच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहते आनंदी आहेत आणि त्यांच्या पद्धतीने मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी जुलैमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह समारंभात ग्रॅमी पुरस्कार विजेता जस्टिन बीबर देखील परफॉर्म करताना दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
स्त्री-2 नंतर चमकले अभिषेक बॅनर्जीचे नशीब; ऑफर होत आहेत मोठ्या सिनेमांत मुख्य भूमिका…