जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे ज्योती आमगे; बॉलिवूड ते हॉलिवूड, सर्वत्र आहेत तिचे दीवाने


भारत देशात अनेक व्यक्ती असे आहेत, ज्यांनी आपल्यातील खास कला-गुणांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरले आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील काही कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री ज्योती आमगेचाही यामध्ये समावेश होतो. तिच्यातील एका खास गोष्टीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत तिच्या नावाचा समावेश झाला. गुरुवारी (१६ डिसेंबर) ज्योतीने तिचा २८ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

ज्योती आमगेचा जन्म १६ डिसेंबर, १९९३ मध्ये नागपूर येथे झाला आहे. ज्योती आमगेच्या आईचे नाव रंजना, तर वडिलांचे नाव किशनजी आमगे आहे. तिचे पालक सामान्य कुटुंबातील आहेत. ज्योतीच्या कुटुंबामध्ये एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत. भावाचे नाव सतीश आमगे असून अर्चना, रुपाली आणि वैशाली अशी तिच्या तीन बहिणींची नावे आहेत. ज्योती ही तिच्या कुटुंबातील एकमेव मुलगी अशी आहे, जी जन्मापासूनच लहान आणि कमी वजनाची आहे. तिची उंची २ फूट ४ इंच आहे, तर तिचे वजन ५.५ किलो आहे.

ज्योतीसाठी तिच्या खाण्याच्या प्लेटपासून ते बेड, कपड्यांपासून प्रत्येक वस्तू तिच्या आकारानुसार बनवावी लागते. ती नागपूरमध्ये एका शाळेत शिकायला गेली होती. त्यावेळी तिच्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. तिच्या ड्रेसपासून खुर्च्यांपर्यंत सर्व काही तिच्या आकाराचे बनवले गेले होते. हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्योती ही पदवीधर आहे.

ज्योतीचे वजन फक्त ५.५ किलो आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. ज्योती आमगे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

ज्योती आमगे २००९ च्या ‘बॉडी शॉक: टू फीट टॉल टीन’ या डॉक्युमेंट्रीमध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त ती सन २००६ मध्ये ‘बिग बॉस ६’ या भारतीय रियॅलिटी टीव्ही शोमध्ये दिसली होती.

ज्योती आमगे २०१४मध्ये अमेरिकन हॉरर स्टोरी ‘फ्री’ शोमध्ये दिसली होती. या शोमुळे त्यांची अमेरिकेसह जगभरात ओळख झाली. याशिवाय तिने एक इटालियन शो देखील होस्ट केला आहे. ज्योतीने ‘लेग जिंदो’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तिने स्वतः अनेक प्रसंगी सांगितले आहे की, तिचा आवडता अभिनेता सलमान खान आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याचे तिचे स्वप्न आहे.

विशेष म्हणजे, तिचा पुतळा लोणावळ्यातील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आहे.

तसेच ज्योती आमगे २०१२मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडली गेली होती. समाजसेवेशी ती जोडलेली आहे. ती नेहमी इतरांची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करते. फावल्या वेळेत समाजसेवा करायला आवडत असल्याचे ती सांगते.

ज्योती आमगेचे लग्न
जगातील सर्वात लहान महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योती आमगेचे लग्न झाले आहे. ३० ऑगस्ट, २०१७ रोजी तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले, तेव्हा जगाला हे समजले होते. तथापि, तिने लग्न आणि इतर कोणत्याही कार्यक्रमाचे कोणताही फोटो शेअर केला नाही. मात्र, तिच्या मैत्रिणीच्या पतीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिच्या पतीचे नाव कमल आहे. ते पूर्णपणे सामान्य आहेत. मात्र ज्योती आमगे हिच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचा मान इतरांपेक्षा वाढला आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!