Wednesday, June 25, 2025
Home अन्य खिलाडी सुरभी! मालदीवच्या निळ्याशार बीचवर बिकिनी घालून व्हॉलिबॉल खेळताना दिसली अभिनेत्री

खिलाडी सुरभी! मालदीवच्या निळ्याशार बीचवर बिकिनी घालून व्हॉलिबॉल खेळताना दिसली अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यांमध्ये असूनही ती सतत पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. सुरभीने इंस्टाग्रामवर तिचे सुट्टीमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती निळ्याशार बीचच्या कडेला बिकिनी घालून, व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे.

‘कुबूल है’ ची झोया म्हणजेच सुरभी ज्योतीची नवीन स्टाईल या फोटोंमध्ये दिसत आहे. ती बिकिनी परिधान करुन अगदी मस्तीच्या मूडमध्ये बीचवर व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे. तिची व्हॉलिबॉल खेळण्याची पद्धत बघून हे स्पष्ट दिसून येते की, सुरभी केवळ अभिनयच नाही, तर खेळांमध्येही माहिर आहे.

या अगोदरही सुरभीने तिचे आणखी काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती श्रग परिधान करुन बिकिनीवर पोझ देत होती. याशिवाय एका फोटोमध्ये ती सायकल चालवतानाही दिसली आहे.

सुरभी ज्योतीचा जन्म 29 मे, 1988 रोजी जालंधरमधील एक पंजाबी-ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ती एक आरजे देखील आहे. सुरभी एक प्रतिभावान नाट्य कलाकार आहे आणि तिने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे.

पंजाबी चित्रपटांमध्ये बर्‍याच भूमिका साकारल्यानंतर, ती झी टीव्हीवरील ‘कुबूल है’ या मालिकेत झोयाची व्यक्तिरेखा साकारताना दिसली. यात तिची भूमिका बरीच गाजली आणि यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सुरभी एकता कपूरच्या ‘नागिन 3’ मध्येही मुख्य भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या व्यक्तीरेखेला खूप पसंती मिळाली आणि तिचे खूप कौतुकही झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गंदी बात’ फेम अभिनेत्री चक्क साडीवर शुट केले बोल्ड फोटो, सोशल मीडियावर सुरु झाली एकच चर्चा

-कधी पायऱ्यांवर तर कधी झाडू घेऊन मस्ती करताना दिसली जेनेलिया! व्हिडिओ पाहून पती रितेशने दिली अशी प्रतिक्रिया

-फिटनेस फ्रिक मलायका अरोराने सांगितले तिच्या निरोगी जीवनाचे रहस्य; चाहत्यांसोबत शेअर केल्या टिप्स

हे देखील वाचा