Saturday, June 29, 2024

सुनील शेट्टीने दिली लेकीच्या लव्ह मॅरेजला परवानगी? फोटो शेअर के. एल. राहुल म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने शुक्रवारी (५ नोव्हेंबर) तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवशी अनेकांनी तिला शुभेच्या दिल्या परंतु यातील एका व्यक्तीच्या शुभेच्छा मात्र खूपच खास होत्या. तुम्हाला अंदाज आलाच असेल. मागील अनेक दिवसापासून अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के.एल. राहुल यांच्या रिलेशनबाबत चर्चा सुरू आहेत.

अनेकवेळा ते दोघे एकमेकांसोबत स्पॉट होत असतात. तसेच ते सोशल मीडियावर देखील फोटो शेअर करत असतात. परंतु अजूनही त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. अशातच अथियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के.एल. राहुलने त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे. त्याने सोशल मीडियावर अथियासोबत एक फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघे एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहे. (K.L. Rahul share a photo with Athiya Shetty and writes happy Birthday my love)

हा फोटो शेअर करून त्याने “हॅप्पी बर्थडे माय हार्ट” असे लिहिले आहे. त्याने हार्ट इमोजो पोस्ट केली आहे. त्यांच्या या फोटोला दोन लाखापेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. खास म्हणजे अथियाचे वडील सुनील शेट्टी आणि छोटा भाऊ अहान शेट्टी यांनी हा फोटो लाईक करून त्यावर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

अथिया शेट्टीने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत काम केले होते. यानंतर तिने ‘मुबारकां’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ती ‘मोतीचुर चकणाचुर’ या चित्रपटात काम केले. अथियाला लहानपणापासून अभिनय करण्याची इच्छा होती. आपल्या वडीलांप्रमाणे आपणही नाव कमवावे असे तिला वाटत होते. यासाठी तिने तसे खास प्रशिक्षण देखील घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा