मंडळी बॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकतं. यापूर्वीही बॉलिवूड कलाकारांच्या लग्नांवर, त्यांच्या घटस्फोटांवर आपण लिहिलंय. कारण बॉलिवूड ही अशी खाण आहे जिथे बातम्यांची, कंटेंटची अजिबात कमी नाही. सामान्य लोकं साधारणतः एकदा केलेलं लग्न हे शेवटपर्यंत टिकवतात. एकमेकांना ही जोडपी प्रत्येक वळणावर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु बॉलिवूडमध्ये आपल्याला मात्र असं होताना दिसत नाही. बॉलिवूडमधील काही असे सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे दोन ते तीन वेळेस घटस्फोट झाले आहेत आणि तीन ते चार वेळेस लग्न देखील झाली आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थ रॉय कपूर
सिद्धार्थ हे बॉलिवूडमध्ये निर्माते म्हणून काम करत आहेत. आपल्याला आठवत असेल की २०१२ मध्ये सिद्धार्थ आणि विद्या हे लग्नबंधनात अडकले होते. परंतु विद्या ही सिद्धार्थ यांची तिसरी पत्नी आहे. तिच्या आधी दोन वेळा सिद्धार्थ यांचं लग्न झालं होतं. सिद्धार्थ यांची पहिली पत्नी त्यांची लहानपणीची मैत्रीण आरती बजाज होती. परंतु हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. यानंतर सिद्धार्थ यांचं दुसरं लग्न मालिका क्षेत्रातील प्रोड्युसर कवितासोबत केलं परंतु २०११ मध्ये हे लग्न देखील तुटलं.
संजय दत्त
संजयने तीन वेळ लग्न केलं आहे. १९९६ मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू पावलेल्या रिचा शर्माशी त्याचं पहिलं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. यानंतर संजयने १९९८ मध्ये रिया पिल्लईशी लग्न केले पण २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजयच्या आयुष्यात मान्यता आली. जिच्याशी त्याने २००८ मध्ये तिसरं लग्न केलं होतं आणि तो दोन जुळ्या मुलांचा वडील झाला आहे. शिवाय संजयची मोठी कन्या त्रिशाला ही अमेरिकेत राहते.
करण सिंह ग्रोव्हर
अभिनेता करणसिंग ग्रोव्हरने २००८ मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमशी पहिलं लग्न केलं होतं, जे केवळ १० महिननेच टिकलं त्यानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला. २०१२ मध्ये करणने जेनिफर विगेटशी दुसरं लग्न केलं जेसुद्धा २०१४ मध्ये तुटलं. यानंतर २०१६मध्ये करणने बिपाशा बसूशी तिसरं लग्न केलं. अजूनतरी दोघेही सुखाने संसार करत आहेत.
नीलिमा अजीम
शाहिद कपूरची आई नीलिमा यांनी १९७५ मध्ये अभिनेता पंकज कपूर यांच्यासोबत पहिलं लग्न केले होतं जे १९८४ मध्ये तुटलं. यानंतर १९९० मध्ये अभिनेता राजेश खट्टरसोबत त्यांनी लग्न केलं जे फक्त २००१ पर्यंतच टिकलं. नीलिमा यांनी २००४ मध्ये रझा अली खानशी लग्न केलं होतं, तेसुद्धा २००९ मध्ये तुटलं.
कबीर बेदी
कबीर बेदी यांनी तब्बल चारवेळा लग्न केलं. १९६९ मध्ये त्यांनी प्रसिद्ध नर्तक प्रतिमा बेदी यांच्याबरोबर पहिल्यांदा लग्न केलं. परंतु १९७४ मध्ये दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. कबीर यांनी दुसरं लग्न ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेसशी केले, जे सुद्धा जास्त काळ टिकलं नाही. नव्वदीच्या दशकात कबीर यांनी टीव्ही प्रेझेंटर निक्कीला आपली तिसरी अर्धांगिनी बनवलं पण हे लग्न सुद्धा टिकलं नाही. वयाच्या ७० व्या वर्षी कबीर यांनी २९ वर्षीय परवीन दुसांजशी लग्न करून सर्वांना चकित केलं. कबीर आता 74 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या चौथ्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
अदनान सामी
प्रख्यात पार्श्वगायक अदनान सामी यांचीही तीन लग्न झाली आहेत. १९९३ मध्ये त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारशी पहिलं लग्न केलं होतं पण त्यांचा घटस्फोट होता. त्यानंतर दुबईची सबन गलाद्री अदनानच्या आयुष्यात आली आणि दोघांनी २००१ मध्ये लग्न केले जे २००४ पर्यंतच टिकू शकलं. त्यानंतर अदनानने २०१० मध्ये अफगाण आणि जर्मन वंशाच्या रोया फरयाबीशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत आणि त्यांना मदिना नावाची एक कन्या देखील आहे.