Friday, July 5, 2024

मुघलांना ‘राष्ट्रनिर्माता’ सांगणाऱ्या कबीर खानने म्हटले होते, ‘कधीच जाणार नाही पाकिस्तानात’; चुकीचा…

भारतामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ पासून लागू केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशींसह सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या धर्मियांना नागरिकत्व मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. यामधून फक्त मुस्लिम समाजाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्याला अनेकांनी विरोध केला. असदुद्दीन ओवैसींनी तर याची प्रत फाडून निषेध व्यक्त केला होता. तसेच बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक कबीर खान यांनी देखील याचा निषेध व्यक्त केला होता. कबीर खान त्यावेळी त्यांच्या या भूमिकेमुळे खूप चर्चेत होते. अशात त्यांनी पुन्हा एकदा मुघलांविषयी एक वक्त्यव्य केलं आहे.

कबीर यांनी या मुलाखतीमध्ये मुघलांविषयी खोटी माहिती पसरवत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. (Kabir Khan said Never will go to Pakistan history is being told wrong)

कबीर खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, “मुघलांविषयी चित्रपटांमध्ये चुकीचा समज पसरवण्याआधी एकदा त्यांचा इतिहास वाचा आणि संशोधन करा. इतिहासाच्या पुराव्यांवरून चित्रपट तयार करा. मुघलांनी कधीच जातीचे आणि धर्माचे राजकारण केले नाही. त्यांच्या लढाया या फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी असायच्या. मुघल हे खरे राष्ट्रनिर्माता आहेत. त्यांच्याविषयी चित्रपटांमध्ये कोणतीही माहिती देताना ऐतिहासिक पुरावे दाखवा.”

मुघलांना राष्ट्रनिर्माता बोलून त्यांना पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागत आहे. याआधी नागरिकत्व कायद्यावेळी ते असेही म्हणाले होते की, “दुर्भाग्य आहे सर्वजण मध्ययुगीन इतिहासाला जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून बघत आहेत. इतिहासाला तोडून मोडून जनतेसमोर मांडले जात आहे.” ते पुढे असंही म्हणतात की, “मुघलांनी कधीच धर्मावरून युद्ध केले नाही. ज्यांनी त्यांचा इतिहास वाचला आहे, त्यांना माहित आहे की, मुघलांनी भारत कोणत्या राजा आणि राजपुताकढून नाही, तर लोधीकडून मिळवला होता. लोधींनी हा देश तुगलकांकडून घेतला, तर तुगलकांनी खिल्जींकडून घेतला आहे.”

कबीर खान त्यांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरूनही चर्चेत राहिले आहेत. त्यावेळी ते असं म्हणाले होते की, “मुस्लिम अभिनेत्यांवरील हल्ले भारतातील असहिष्णुता वाढवत आहेत.” या वक्तव्यामुळे देखील ते बरेच दिवस चर्चेत होते. साल २०१६ मध्ये त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यादरम्यान त्यांना बॉर्डरवर जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल? असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीचे कारण देत, “हे शक्य नाही, माझ्या पत्नीने मला पाकिस्तानमध्ये कधीच नाही जायचे असे सांगितले आहे,” असे म्हटले होते.

कबीर खान हे एक यशस्वी दिग्दर्शक असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘काबूल’, ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांचे दिगदर्शन केले आहे. त्यांच्या मुस्लिम समाजाविषयी असलेल्या भावनांमुळे आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध असल्यामुळे ते कायमच चर्चेत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा