एखादा सिनेमा बनताना त्यामागे खूप मोठी फौज असते. हजारो माणसं एका सिनेमासाठी काम करत असतात. कॅप्टन ऑफ द शिप असणारा दिग्दर्शक आणि त्याच्या मागे असणारी कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉट बॉय आदी अनेक लोकांची टीम असे हे काम चालते. जेव्हा अनेक लोकं एकत्र येतात तेव्हा साहजिकच त्यांच्यामध्ये काही वेळेला वैचारिक मतभेद नक्कीच निर्माण होतात किंवा असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या उक्ती प्रमाणे जेवढे कलाकार तेवढेच त्यांचे विचार एकत्र येतात आणि कधी कधी मतभेद निर्माण होतात, असे असले तरी मनभेद होत नाही. असेच दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यामध्ये देखील होते.
View this post on Instagram
बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक कबीर खान आणि सुपरस्टार सलमान खान या जोडीने आतापर्यंत अनेक सिनेमे सोबत केले. या जोडीचे काही अपवाद वगळता सर्वच सिनेमे तुफान गाजले. नुकतेच कबीर खान यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि सलमान खानच्या नात्यावर भाष्य केले आहे. यादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्यामध्ये नक्कीच मतभेद होते मात्र मतभेद नव्हते. सलमान खान आणि कबीर खान यांच्या ‘ट्युबलाइट’ हा शेवटचा सिनेमा आला, जो खास कमाल दाखवू शकला नाही. त्यावेळी मीडियामध्ये बातम्या येत होत्या की, कबीर खान आणि सलमान खान यांचे नाते ठीक नाही. मात्र आता कबीर खान यांनी सांगितले की, “शूटिंग दरम्यान अनेकदा सलमान खानला राग यायचा मात्र त्याने कधी माझा अपमान नाही केला.”
पुढे कबीर खान म्हणाले, “माझे त्याच्यासोबत चांगले नाते आहे. मी त्याच्यासोबत अनेक सिनेमे बनवले असून, त्या चित्रपटांचा मी खूप आनंद घेतला. त्याचे मन नेहमीच विचारांनी भरलेले असायचे. सेटवर येताच तो मला त्याचे विचार सांगायचा. मी याला कधीच माझ्या कामात हस्तक्षेप असे पाहिले नाही. मला याचा आनंद आहे की, मी जे जे सलमानला सांगितले त्याचा त्याने विचार केला आणि जे जे योग्य वाटले त्यावर काम देखील केले.”
View this post on Instagram
कबीर खान पुढे म्हणाले, “सलमान कधीच त्याच्या सुपरस्टारडमचे प्रदर्शन नाही केले. असे अनेकदा घडले जेव्हा माझे आणि सलमानचे विचार अनेक गोष्टींसाठी जुळले नाही. यासाठी आम्ही भांडलो, नाराज झालो. मात्र नेहमीच असे झाले की मी त्याची समजूत घालण्यात सक्षम होतो, नैतर तो माझी समजूत घालण्यात.” तत्पूर्वी आता कबीर खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत काम करत असून सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टाइगर 3’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘प्रेम स्वाभाविक नाही’, म्हणत नागराज मंजुळे यांनी सांगितला त्यांच्या पहिल्या प्रेमाचा भन्नाट किस्सा
पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत