Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड शाहिद कपूरची पत्नी मीराने फक्त २३ सेकंदात केला मेकअप, चाहता म्हणाला, ‘वहिनी, माझ्या बायकोलाही…’

शाहिद कपूरची पत्नी मीराने फक्त २३ सेकंदात केला मेकअप, चाहता म्हणाला, ‘वहिनी, माझ्या बायकोलाही…’

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरदिवशी ती सोशल मीडियावर तिचे धमाकेदार व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने जिंकते. अलीकडेच मीराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये मीरा २३ सेकंदात मेकअप करताना दिसत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मीरा राजपूतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक मेकअप ट्यूटोरियल व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काही सेकंदात मेकअप करताना दिसत आहे. तिची ही शैली चाहत्यांना वेड लावत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ दशलक्षपेक्षा अधिक वेळा लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओवर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “वहिनी ही आयडिया माझ्या बायकोलाही शिकवा.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तुम्ही नैसर्गिक लुकमध्येही खूप सुंदर दिसत आहात, तुम्हाला मेकअपची अजिबात गरज नाही.”

मीरा आहे १३ वर्षांनी लहान
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न २०१५ मध्ये झाले. शाहिद आणि मीराला दोन मुलं आहेत. मीरा शाहिदपेक्षा तब्बल १३ वर्षांनी लहान आहे. परंतु दोघांमधील ट्यूनिंगने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहिद आणि मीरा यांच्या जोडीचा चाहत्यांच्या आवडत्या यादीत समाविष्ट केले आहे. मीरा शाहिदसोबत अनेक प्रसंगी स्पॉट झाली आहे. एवढेच नाही, तर कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात ती कुटुंबासह दिसते. (Kabir Singh’s real life love did makeup in just 23 seconds)

शाहिदबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ‘कबीर सिंग’ या चित्रपटात दिसला होता. शाहिदने या चित्रपटात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता तो ‘जर्सी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा