कोरोनाने प्रत्येकाची हालत खराब केली आहे. शेतकरी चिंतेत आहेत, व्यापारी नाराज आहेत, तर काही लोक घरात बसावे लागते म्हणून नाराज आहेत. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे लोक चांगले उपचार, बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी काळजीत आहेत. काहीजण या महामारीत आपल्या जवळच्या लोकांना गमावल्याने दुःखी आहेत. एकंदरीत सर्वत्र ताणतणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी धैर्य राखणे खूप आवश्यक आहे. शारीरिक आरोग्य जितके गरजेचे आहे, तितकेच मानसिक आरोग्यही गरजेचे आहे.
याशिवाय कोरोना योद्धाही रुग्णांना कोरोना विषाणूपासून वाचविण्यासाठी जोरदार लढा देत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कोरोना योद्धांनाही या काळात सकारात्मक राहण्याची गरज आहे. या भयंकर काळात लोकांनी खचून जाऊ नये म्हणून बरीच गाणी देखील आली आहेत. असेच एक गाणे पुन्हा समोर आले आहे.
या गाण्याद्वारे रात्रंदिवस काम करणाऱ्या कोरोना योद्धांना सलाम करण्यात आला आहे. वास्तविक हे गाणे कैलाश खेर, शिबानी कश्यप आणि सुदेश भोसले यांनी गायले आहे. तसेच गाणे हुनर हाटच्या यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल आहेत, “तूफानों से.”
या गाण्याची एक छोटी व्हिडिओ क्लिप व्हायरल भयानीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. जी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तसेच युजर्स कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ