दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये देखील चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावरून ती तिच्या फॅन्ससोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांना खुश करत असते. काजल या दिवसात खूपच चर्चेत आहे. कारण तिचे एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘मुंबई सागा’ आणि मोसागोल्लू तिचे हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. तिच्या या चित्रपटासाठी तिला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. अशातच तिने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
काजलने तिचे फोटो शेअर करून लिहले आहे की, ” मी माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबत शूटिंग करत आहे, तुम्ही सांगू शकता कोण असेल ती व्यक्ती?” तिच्या या प्रश्नांनानंतर तिच्या फॅन्सने अनेक अंदाज लावले. काहींनी साऊथमधील चिरंजीवी याचे नाव घेतले आहे, तर काहींनी नागार्जुनचे नाव घेतले आहे. तरीही अजून कोणालाच कळले नाही की, काजलच्या आवडीची व्यक्ती कोण आहे.
Shooting with my most favourite person. Guess who? ???? pic.twitter.com/S29R2QDqsk
— Kajal Aggarwal (@MsKajalAggarwal) March 20, 2021
काजल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ती लवकरच लाईव्ह टेलिकास्ट या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. वेंकट प्रभू यांची ही वेबसीरिज डिस्नी हॉटस्टार प्लसवर रिलीज होणार आहे. काजलने या सीरिजमधील एक भयानक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने असे सांगितले की, शूटिंगनंतर ती जेव्हा घरी गेली तेव्हा रात्रभर तिला झोप लागली नव्हती.
काजल एका अभिनेत्री सोबत एक इन्वेस्टर देखील आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तिने बिस्नेस वूमन बनण्याचा रस्ता निवडला. काजलने ओके गेमिंग नावाच्या कंपनीमध्ये 15 टक्के भाग खरेदी केला आहे. ओके गेमिंग कंपनी मुंबईस्थित एक गेमिंग कंपनी आहे.










