Saturday, June 29, 2024

काजल अग्रवालच्या चाहत्यांना मोठा धक्का; पतीच्या म्हणण्यावरुन अभिनेत्री सोडणार फिल्म इंडस्ट्री?

प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या वर्षीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाअगोदर ती बराच काळ गौतम किचलूला डेट करत होती, त्यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. या परिपूर्ण दांपत्याचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. याशिवाय काजलने तिच्या लग्नादरम्यान हे स्पष्ट केले होते की, ती चित्रपट करणार आणि चाहत्यांचे मनोरंजन करत राहणार आहे. आता काजल आपल्या बोलण्यावरून पलटताना दिसत आहे. तिच्या या नवीन विधानामुळे चाहतेही गोंधळात पडले आहेत.

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, ती अभिनय सोडून देऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काजल अग्रवाल म्हणाली की, जर तिचा पती तिला चित्रपट करण्यास मनाई करेल, तर ती त्वरित अभिनय करणे थांबवेल. काजलच्या म्हणण्यानुसार, याक्षणी ती पूर्णपणे अभिनयाकडे लक्ष देत आहे. लग्नानंतरही तिला तिचा पती गौतम किचलू आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. यामुळे ती अजूनही तिच्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CK4Gqlxnu9T/?utm_source=ig_web_copy_link

काजल अग्रवाल पुढे असेही म्हणाली की, ती किती काळ अभिनय सुरू ठेवेल हे माहित नाही. अभिनेत्री म्हणाली की, जर तिचा पती तिला अभिनय सोडून देण्यास सांगत असेल, तर ती लगेचच फिल्मी जगाला निरोप देईल. इतकेच नव्हे, तर अभिनेत्रीने हेही स्पष्टपणे सांगितले की, ती नवीन चित्रपट साइन करत नाहीये, तर ती केवळ साईन केलेल्या तिच्या जुन्या प्रकल्पांवर लक्ष देत आहे.

काजल अग्रवाल लवकरच चिरंजीवी अभिनित चित्रपट ‘आचार्य’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोरतल्ला शिवा आहे. याशिवाय ती ‘इंडियन २’ आणि ‘हे सिनामिका’ या तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती ‘मुंबई सागा’ आणि दाक्षिणात्य चित्रपट ‘मोशागुल्ला’ मध्ये दिसली होती. तसेच काजलच्या लग्नाने बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या. काजलच्या हनीमूनचे फोटोही व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवलंच म्हणायचं अन् काय! ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानमुळे अभिनेत्रीने दिवसभर धुतले नव्हते आपले हात

-‘माझ्या वॉचमॅन आणि ड्रायव्हरने मला…’, न्यूड व्हिडिओ लीकवर उघडपणे बोलली राधिका आपटे

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

हे देखील वाचा