Saturday, June 29, 2024

प्रेग्नेन्सीबाबत चाललेल्या चर्चांवर काजल अग्रवालने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. काजलने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या व्यवसायिक आयुष्याबाबत ती नेहमीच चर्चेत असते. अशातच मागील काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून काजल प्रेग्नेंट आहे, अशा बातम्या येत आहेत. तिने मागच्या वर्षी गौतम किचलूसोबत लग्न केले आहे. परंतु तिने तिच्या प्रेग्नेंसीबाबत अजून कोणतेही वक्तव्य केले नव्हते. परंतु आता तिने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र तरीही याबाबत लोकांचा संभ्रम दूर झाला नाही.

काजलने यावर तिचे मत मांडताना सांगितले की, “मला आता तरी याबाबत काहीही बोलायचे नाही.” परंतु तरीही यावरून ती प्रेग्नेंट आहे की, नाही ही गोष्ट स्पष्ट झाली नाही. (Kajal Aggarwal finally open up in pregnancy rumours actress also talk about motherhood )

तिने मातृत्वावर तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, “मातृत्वाबाबत मी कधी उत्साहित होते तर कधी उदास होते. मी माझ्या बहिणीला बघितले आहे की, आई झाल्यावर तिचे आयुष्य किती बदलले आहे आणि कशी ती स्वतःला परिपूर्ण समजते.”

तिने पुढे सांगितले की, “मला असे वाटते की, मातृत्व एक सुंदर अनुभव आहे. मी माझ्या दोन भाच्यांचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मला वाटते की, जेव्हा मी आई होईल तेव्हा माझ्या भावना अजूनच वाढतील.”

काजलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ती ‘सिनामिका’, ‘घोस्टी’, ‘उमा’, ‘आचार्या’, ‘इंडियन २’, ‘पॅरिस पॅरिस’ या चित्रपटात दिसणार आहे. काजल अग्रवालने ‘सिंघम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा