Wednesday, June 26, 2024

प्रेग्नन्सी काळ दुबईमध्ये एन्जॉय करणाऱ्या काजल अग्रवालने बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रात आपला तगडा बस बसवलेली अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल (Kajal Aggarwal). साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार असलेल्या काजलने बॉलिवूडमध्ये देखील तिचे चांगले प्रस्थ तयार केले. आपल्या बबली अंदाजामुळे काजल ओळखली जाते. सध्या काजल तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. लवकरच काजल आणि तिचा नवरा गौतम किचलू (Gautam Kitchlu) त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. सध्या हे कपल दुबईमध्ये सुट्ट्यांसाठी गेले आहेत. काजोलने तिच्या या व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, या फोटोंमध्ये काजल तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मात्र तिच्या या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून, तिच्या वाढत्या वजनावरून तिला आता बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे.

काजल अग्रवालने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले असून , या तिन्ही फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचा यात कॅज्युअल लूक खूपच आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहे. या फोटोंसोबत तिने एक लांबलचक नोट लिहून प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर भाष्य केले आहे. यासोबतच तिने ट्रोलर्सला देखील चांगलेच सुनावले आहे.

काजलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी माझ्या आयुष्यातील, शरीरातील, घरातील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणांमधील नवनवीन होणाऱ्या बदलांसोबत झगडत आहे. याशिवाय काही कमेंट्स, बॉडी शेमिंग मेसेज, मिम्स यात माझी अजिबात मदत करत नाही. दयाळूपणा दाखवा आणि नसेल येत तर जगा आणि जगू द्या. माझी ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे, जे माझ्या विचारांप्रमाणे विचार करतात, माझ्यासारख्याच परिस्थितीतून जात आहे. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आहे ज्यांना ही गोष्ट माहित नाही.”

पुढे काजलने लिहिले, “प्रेग्नन्सीच्या काळात आमच्या शरीरात अनेक बदल होतात, ज्यात वजन वाढणे देखील येते. हार्मोनल बदलांमुळे आमचे पोट आणि ब्रेस्ट देखील मोठे होतात. कारण बाळ मोठे होत असते आणि आमचे शरीर ब्रेस्ट फिडींगसाठी तयार होते. स्ट्रेच मार्क्स येतात, खूप थकवा येतो, मुड स्विंग्स, नकारात्मक मूडमुळे शरीरात नकारात्मक विचार येतात. बाळ जन्माला आल्यानंतर आम्हाला पुन्हा पूर्वीसारखे दिसण्यासाठी वेळ लागतो.”

पुढे ती म्हणते, “हे सर्व बदल नैसर्गिक असतात. आम्हाला एका बॉक्समध्ये किंवा स्टीरियोटाइप मध्ये फिट होण्याची गरज नाही. जीवनातील या सुंदर काळात आम्हला दबाबावाखाली येण्याची गरज नाही. आपल्याला लक्षत ठ्वले पाहिजे की, एका छोट्या जिवाच्या जन्माची ही पूर्ण प्रक्रिया एक उत्सव आहे. ज्याचा अनुभव मिळणे आपल्यासाठी सौभाग्य आहे. धन्यवाद.” काजलने ३० ऑक्टोबर २०२० साली उद्योजक गौतम किचलूसोबत लग्न केले. १ जानेवारी २०२२ ला तिने तिची प्रेग्नन्सी जाहीर केली.

हेही वाचा :

हे देखील वाचा