Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड काजल अग्रवालने केलं मॅटर्निटी शूट, ग्लॅमरस अंदाजात ‘बेबी बंप’ फ्लॉंट करताना दिसली अभिनेत्री

काजल अग्रवालने केलं मॅटर्निटी शूट, ग्लॅमरस अंदाजात ‘बेबी बंप’ फ्लॉंट करताना दिसली अभिनेत्री

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आणि गौतम किचलू लवकरच आई-वडील होणार आहेत. अभिनेत्री सध्या तिच्या पहिल्या गर्भधारणेचा खूप आनंद घेत आहे. काजलने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नूर दिसत आहे. अभिनेत्रीचा फोटो पाहून ती आपल्या बाळासाठी किती उत्सुक आहे हे स्पष्ट होते. काजल तिच्या नवीन फोटोमध्ये अभिमानाने बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

लेटेस्ट फोटोमध्ये काजल अग्रवालने लॉंग काळा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा बेबी बंप हाताने पकडला आहे. काजलच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने तिचे केस मधून भांग पाडून मोकळे ठेवले आहेत. तसेच, तिने गडद डोळ्यांच्या मेकअपसह लाइट लिप शेड कॅरी केली आहे. अभिनेत्रीचे हे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. (kajal aggrawal posses in black dress for maternity photoshoot check here new pics)

काजल अग्रवालने यापूर्वी तिच्या कुटुंबियांसोबत म्हणजेच, पती गौतम किचलू आणि तिचा पाळीव कुत्रा मिया यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. कौटुंबिक फोटोमध्ये, अभिनेत्री काळा स्कर्ट आणि पांढरा शर्ट घालून पोझ देत होती. त्याचवेळी तिचा पती पांढऱ्या शर्टमध्ये अभिनेत्रीकडे पाहताना दिसला. काजलने ब्लॅक अँड व्हाइट फिल्टरसह फॅमिली फोटो शेअर केला आहे. तिने फोटोसोबत कॅप्शन लिहिले, “#ThisIsUs.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केले होते. या जोडप्याने कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न विधी पार पाडले. काजल आणि गौतम लग्नापूर्वी एकूण ७ वर्षे मित्र होते आणि ते ३ वर्षे डेट करत होते. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लॉकडाऊन दरम्यानच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा