Thursday, November 13, 2025
Home भोजपूरी ‘मुलींना खूप गरम होते कारण त्या खूप हॉट असतात’, पाहा नक्की काय केलाय ‘या’ अभिनेत्रीने असा दावा

‘मुलींना खूप गरम होते कारण त्या खूप हॉट असतात’, पाहा नक्की काय केलाय ‘या’ अभिनेत्रीने असा दावा

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सगळ्यांची‌ आवडती अभिनेत्री म्हणजे काजल राघवानी. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचा प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडिओ सगळ्यांच्या चर्चेमध्ये असतो. या दिवसात तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरील तिच्या अनेक चाहत्यांनी अत्यंत मजेशीर कमेंट केली आहे. भोजपुरी चित्रपट सृष्टीमधील काजल राघवानी एक प्रसिद्ध अभिनेत्री ‌आहे. ती चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो तिच्यासोबत शेअर करत असते.

नुकताचा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती एक डायलॉग बोलते, त्यामुळे सगळेजण तिच्याकडे आकर्षित झाले आहे. तिच्या या व्हिडिओला अगदी काही तासांमध्येच पन्नास हजाराच्यांवर व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये काजल राघवानीने काळया रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती मस्ती करत आहे. मस्तीच्या अंदाजात तिने एक तिच्या या डायलॉगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये असे म्हणते की, “मुलींना खूप गरम होते कारण त्या आधीपासूनच खूप हॉट असतात.” तिच्या डायलॉगवर तीच्या अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहे. तिच्या एका चाहत्याने असे लिहिले आहे की, “तुम्ही माझ्या भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात आवडत्या आहात.” तर दुसऱ्या एकाने लिहीले आहे की, “तुम्ही तर खूपच हॉट आहात म्हणजे गरम तर होणारच ना.”

काजल राघवानी सध्या तिच्या ‘अमानत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या‌ शूटिंग‌ मधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चित्रपटाची शूटिंग उत्तर प्रदेशमध्ये होत आहे. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. या चित्रपटात काजलसोबत अभिनेता आनंद हा देखील दिसणार आहे.

खरंतर काजल राघवानी ही मूळची गुजरातची आहे. त्यामुळे भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्याचा असा तिने कोणत्याही विचार केला नव्हता. भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये येण्याआधी ती भोजपुरी भाषेचा आणि तेथील कल्चरचा अभ्यास करत होती. वयाच्या नवव्या वर्षी तिने डान्स क्लास जॉईन केला आणि ती खूप चांगल्या प्रकारे डान्स करायला लागली, तेव्हा काही दिवसानंतर तिने एका प्रोफेशनल डान्स ग्रुप जॉईन केला.

काजलने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने जवळ जवळ पाच वर्ष बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. त्या डान्समध्ये तिला तिची उंची कमी असल्यामुळे सगळ्यात मागे उभे केले जात‌ असायचे. त्यानंतर तिने वयाच्या सोळाव्या वर्षी गुजराती चित्रपट केला, आणि या चित्रपटानंतर भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक ऑफर्स येऊ लागल्या. तिने भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज चित्रपटसृष्टी मधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

हे देखील वाचा