Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

दुर्गा पूजेदरम्यान ‘लालपरी’ बनत काजोलने वेधले सर्वांचेच लक्ष

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असणारी काजोल अतिशय बबली आणि बडबडी आहे. आपल्या अभिनयाने आणि इंडस्ट्रीमधील तिच्या वावराने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसणारी काजोल तिच्या उपस्थितीने सर्वांचेच मनं जिंकून घेत असते. काजोलचा चाहता वर्गही खुप मोठा आहे. नुकतीच काजोल दुर्गा पूजन करण्यासाठी दुबईमध्ये दुर्गा पंडालमध्ये दिसून आली. या पंडालमधले काजोलचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी लाल साडीमध्ये दिसणाऱ्या काजोलने सगळ्याचे लक्ष वेधत लाईमलाइट मिळवले.

दरवर्षी प्रमाणे काजोल लाल रंगाची सुंदर साडी नेसून दुर्गा मातेची पूजा करण्यासाठी आली होती. काजोलची आई जरी महाराष्ट्रीयन असली तरी काजोलचे वडील बंगाली होते. त्यामुळे ती दुर्गा पूजा देखील मोठ्या उत्साहाने साजरी करते. काजोलच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास तिने तिचा लूक अतिशय साधा मात्र आकर्षित असा ठेवला होता. लाल रंगाच्या साडीवर तिने महागडे दागिने घातले होते. परंतु काजोलच्या आईची तब्येत ठीक नसल्याने काजोल जरा चिंतेत दिसली.

दरवर्षी दुर्गा पूजेच्या निमित्ताने काजोल आईसोबत दिसत असते. या दोघानींसोबत तनिषा देखील असते. परंतु यावेळी प्रकृती अत्यवस्थ असल्याने तनुजा पूजेला आल्या नाही. त्यामुळे पूजेत काजोल एकटीच सहभागी झाली होती.

दरम्यान ५ ऑगस्ट १९७४ रोजी बंगालमध्ये काजोलचा जन्म झाला. 90 च्या दशकातील लोकप्रिय यशस्वी अभिनेत्री म्हणून काजोलची हिंदी चित्रपट जगतात ओळख आहे. अनेक लोकप्रिय चित्रपटात काजोलने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘बेखुदी’ चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. बाजीगर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे, या सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे. अजय देवगण सोबत २४ फेब्रुवारी १९९९ रोजी ती विवाह बंधनात अडकली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा