Wednesday, June 26, 2024

काजोल बनली ‘निंजा हातोडी!’ हवेत उडवत तिने केले सफरचंदाचे दोन भाग; काहींनी दिली पसंती, तर काहींनी केलं ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या रुपेरी पडद्यापासून दूर झाली आहे, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती दरदिवशी सोशल मीडियावर चर्चेत राहत असते. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटोंच्या आणि कधीकधी मजेदार व्हिडिओंच्या माध्यामातून चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावरही काजोलची तगडी फॅन फॉलोविंग आहे. यामुळे तिचे पोस्ट्स शेअर होताच इंटरनेटवर व्हायरल होऊ लागतात. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.

काजोलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, ती सफरचंद हवेत उडवून कापताना दिसत आहे. आपण यात पाहू शकतो, की प्रथम ती सफरचंद हवेत फेकते. नंतर चाकूच्या साहाय्याने सफरचंदाचे दोन भाग करते. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘मूड’ देखील लिहिले आहे. अभिनेत्रीच्या ऍक्शनने भरलेल्या या स्टाईलला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच, व्हिडिओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत.

मात्र, काही नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडला नाही. बऱ्याच युजर्सने अन्न वाया घालवल्याबद्दल काजोलवर टीका केली आहे. एका युजरने लिहिले, “अशा प्रकारचे अन्न वाया घालवू नका. बरेच लोक भुकेले आहेत. या प्रकारच्या पोस्टला प्रोत्साहित करू नका.” दुसर्‍या युजरने लिहिले, “लोक भुकेने मरत आहेत, त्यांची थट्टा करू नका. अन्न वाया घालवू नका.” एका अन्य युजरने लिहिले, “अन्नाचा अनादर करू नका, मॅडम.”

यापूर्वीही अभिनेत्रीचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याअगोदर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, काजोल भरतनाट्यम ड्रेस परिधान करताना दिसत आहे. त्याच वेळी, यातही तिने अगदी मजेदार अंदाजात डान्स केला. या व्हिडिओलाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, की ती खूप मजा घेत नाचत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! ‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात कोरोनाच्या विळख्यात, चाहतेही पडले काळजीत; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा शहनाज गिलच्या भावासोबतचा बाथटब व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

-सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स

हे देखील वाचा