Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

सध्या नवरात्री उत्सव सर्वत्र सुरू आहे. अनेक कलाकार देखील देवीची मनोभावे सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. अशात प्रसिद्ध अभिनेत्री काजोल देखील देवीची मनोभावे पूजा करत आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनयासह आपल्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अशात तिचे दुर्गा पूजेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

कोरोना महामारीमुळे सर्व काही बंद होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत या सर्व सणांवर काही निर्बंध लावत ते साजरे केले जात आहेत. अशात काजोल खूप दिवसांनी दुर्गा पूजेनिमित्त तिच्या काकांना भेटली. यावेळी खूप दिवसांनी काकांना भेटल्यामुळे तिने त्यांना मिठी मारली आणि तिला अश्रू अनावर झाले.

दुर्गा पूजेनिमित्त तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच हातामध्ये तिने हिरवा चुडा देखील भरला आहे. कपाळी कुंकू आणि हिरवी टिकली देखील लावलेली आहे. तसेच गळ्यात मोठ्या हिऱ्यांनी भरलेला नेकलेस घातला आहे. काजोल या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो आणि व्हिडिओ फोटोग्राफर व्हायरल भयानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. काजोलने देखील स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काजोलने आजवर अभिनय क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. या सिनेसृष्टीला तिने आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. नुकतेच शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर काही जुन्या व्हिडिओमुळे तिला ट्रोल देखील केले होते.

काजोलच्या चित्रपटांबाबत बोलायच झालं, तर तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा