Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘किती गर्विष्ठ बाई आहे, हिची लायकी…’, म्हणत वाढदिवशीच काजोलला केले गेले मोठ्या प्रमाणात ट्रोल

‘किती गर्विष्ठ बाई आहे, हिची लायकी…’, म्हणत वाढदिवशीच काजोलला केले गेले मोठ्या प्रमाणात ट्रोल

अभिनेत्री काजोलने नुकताच तिचा (५ ऑगस्ट) वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला फॅन्स सोबतच कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा पती अभिनेता अजय देवगणने देखील तिला हलक्या अंदाजात विश केले आहे. एकीकडे सर्व पोर्टलवर, सगळीकडे काजोलचा उदो उदो चालू आहे. तर तेव्हाच दुसरीकडे काजोलला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

आपल्या आवडत्या कलाकारांचा वाढदिवस म्हणजे फॅन्ससाठी ही जणू पर्वणीच असते. अनेक फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकारांचा वाढदिवस घरी किंवा त्यांच्या घराबाहेर जाणून साजरा करतात. अशातच अभिनेत्री काजोलचा वाढदिवस देखील तिच्या फॅन्सने तिच्या घराबाहेर जाऊन, तिला भेटून साजरा करण्याचे ठरवले होते. असंख्य फॅन्स तिच्यासाठी, तिची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर ताटकळत उभे होते. काहींनी सोबत केक देखील आणला होता. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, काजोल तिच्या घराबाहेर उभे असणाऱ्या चाहत्यांना भेटण्यासाठी आलेली दिसते. त्यानंतर फॅन्सने आणलेला केक काजोल दुरूनच कापते आणि दुसऱ्या क्षणी आत निघून जाते. ती आत जात असताना तिचा एक चाहता मॅडम एक फोटो असे म्हणतो. पण ती आत निघून जाते. मात्र, थोड्याच वेळेत पुन्हा ती बाहेर येते आणि चाहत्यांसोबत फोटो काढते.

काजोलचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटकरी त्यांचा राग व्यक्त करत आहे. एकाने लिहिले आहे की, ‘ही विसरली आहे वाटते, की याच लोकांनी तिला आज ती जिथे आहे तिथे पोहचवले आहे. असे वागत आहे, जसे की त्यांच्यावर उपकार करत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘फॅन्सचं कोणताच आदर नाही. समजत नाही लोकं पण का मागे लागतात. भाव देणे बंद करा आपोआप वठणीवर येतील.’ अजून एकाने लिहिले, ‘काश येथे एक डिसलाइक बटन असते, गर्विष्ठ बाई.’, अजून एक म्हणाला, ‘अभिनय असा आहे की, लोकांवर उपकार करत आहे. खरंच यार खऱ्या आयुष्यातही हे लोकं अभिनयच करतात.’

अजून एक लिहितो, ‘का जातात अशा लोकांसाठी केक घेऊन ज्यांना काहीच रस नाही यात. त्यापेक्षा घरी घेऊन गेले असते, तर आई वडील मुलं खुश झाले असते.’ एका यूजरने लिहिले, ‘गर्विष्ठ बाई, हिची लायकीच नाहीये यासर्व गोष्टींसाठी, या पेक्षा अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा करा.’ आदी अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी काजोलला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा