काजाेलचा (Kajol) नवीन चित्रपट ‘मां’ (Maa) काही तासांतच प्रेक्षकांच्या भेटीला येताेय, आणि प्रदर्शित झाल्यावर ताे बाॅलीवूडमध्या एतिहासिक चित्रपटांमध्ये माेजला जाणार आहे. का आणि कसा ते जाणून घेऊया !
काजाेलचा ‘मां’ हा चित्रपट 27 जूनला थेट सिनेमागृहात येताेय. हा एक हाॅरर चित्रपट आहे आणि काजोलचा ‘मां’ हा चित्रपट 27 जूनला थेट सिनेमागृहात येतोय. प्रदर्शितच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाबद्दल जे अंदाज लागले आहेत, ते खूप आशा देणारे आहेत. या आधीही काही हॉरर चित्रपटांनी पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली होती. तर बघूया, काजोलचा हा चित्रपट त्या टॉप हॉरर चित्रपटांच्या यादीत कुठे बसतोय!
या चित्रपटासाठी सगळं काही सोपं नव्हतं, कारण त्याच दिवशी सोनाक्षी सिन्हाचा हॉरर चित्रपट ‘निकिता रॉय’ सुद्धा रिलीज होणार होता. तो या चित्रपटाला जोरदार टक्कर देऊ शकला असता. पण प्रदर्शितच्या एक दिवस आधीच सोनाक्षीच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलून जुलै केली गेली. त्यामुळे आता स्पर्धा थोडी कमी झाली आहे. तरीही ‘हाऊसफुल 5’ आणि ‘सितारे जमीन पर’ हे दोन मोठे चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर आहेत.
‘कोई मोई’ च्या रिपोर्टनुसार, काजोलचा ‘मां’ हा चित्रपट पहिल्या दिवशी 4.5 ते 5 कोटींची कमाई करू शकतो. आणि सोनाक्षीचा चित्रपट पुढे गेल्यामुळे ही कमाई आणखी थोडी वाढू शकते. काजोलचा हा चित्रपट अजय देवगणच्या सुपरहिट ‘शैतान’ युनिव्हर्सचा भाग आहे, म्हणूनच प्रेक्षकांना वाटतंय की हा चित्रपटही जबरदस्त चालेल. पण तरीही चित्रपटाचं रस्ता सोपा नाहीये.
‘मां’ हा चित्रपट वर दिलेल्या सगळ्या हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड तोडला, तरी काजोलसाठी आपल्या नवऱ्याच्याच म्हणजे अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाला टक्कर देणं फारच कठीण आहे. आता खरी कमाई किती झाली हे तर मूळ आकडे आल्यावरच समजेल !
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा