Wednesday, July 3, 2024

जावयाच्या गाण्यावर सासूबाईंचे मजेशीर एक्सप्रेशन, काजोलने शेअर केला आईचा फनी व्हिडिओ

हिंदी चित्रपटातली अभिनेत्री काजोलने तिच्या आईचा अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तनुजा फनी एक्सप्रेशन देताना दिसत आहे. सोशल मीडिया आणि कलाकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सोशल मीडियावर कलाकार त्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसतात. काजोलने देखील तिच्या आईचा एक हटके आणि मस्त व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री काजोलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिची आई असणाऱ्या तनुजा दिसत आहे. त्या एका खुर्चीवर बसल्या असून, हसत कॅमेराकडे पाहत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचे टायटल सॉन्ग वाजत आहे. या गाण्यावर त्या व्हिडिओमध्ये फनी एक्सप्रेशन देत असून, त्यामुळे सर्वच लोकं हसत आहे. तनुजा यांनी जीन्स टॉप घातला असून, त्यावर स्टोल घेतला आहे. त्या त्यांच्या बॉय हेअर कटमध्ये खूप आकर्षक दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर या शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्या दिसल्या. काजोलच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत हा विडिओ आवडल्याची पोचपावती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर एका चाहत्याने लिहिले, “आईसारखे कोणी नाही.” बऱ्याच लोकांनी तनुजा ह्यांची स्तुती करत सुंदर, ब्यूटीफुल, अमेझिंग असेही लिहिले आहे.

जेव्हा तनुजा सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये गेस्ट म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी नूतन यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. त्या म्हणाल्या की, “माझ्यासाठी नूतन एक आईसारखी होती अजूनही आहे. कारण ती माझ्यापेक्षा साडेसात वर्षांनी मोठी होती. शूट दरम्यान, नूतनने मला फक्त धडा शिकवण्यासाठी १२ केळी खाण्यास लावली होती. तिला चांगलेच माहीत होते की मला केळी अजिबात आवडत नाही. माझ्या मुली काजोल आणि तनिषा सुध्दा हेच करतात.

तनुजा यांच्या मुली काजोल आणि तनिषा यांनीही त्यांच्या आईसाठी व्हिडिओ कॉलद्वारे शोमध्ये पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी काजोलने सांगितले की, ‘तनुजासारखी आई बनण्याची माझी इच्छा आहे.’ तर तनिषाने सांगितले की, ‘माझ्या आईने आम्हाला शिकवलेला एक धडा म्हणजे कोणाकडून कधीही मदत न घेणे आणि स्वतःचा मार्ग शोधणे.’

जेष्ठ अभिनेत्री तनुजा ह्यांनी आपल्या करियरची सुरुवात ‘देया नेया’ ह्या बंगाली चित्रपटापासून केली. तनुजा यांनी भरपुर हिंदी आणि काही मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. ‘हाथी मेरे साथी’, ‘मेरे जीवन साथी’ ,’चांद ओर सुरज’, ‘नई रोशनी’, ‘हम शकल’, ‘रुस्तम’, ‘सन ऑफ सरदार’, ‘भूत’, ‘झाकोळ’ आदी अनेक हिट चित्रपटांचा समावेश या यादीत होतो. त्यांची जोडी खासकरून राजेश खन्ना ,धर्मेंद्र यांच्यासोबत खूप लोकप्रिय झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा