कलाकार त्यांच्या शूटिंगच्या निमित्ताने किंवा सुट्ट्यांच्या निमित्तने सतत कोणत्या ना कोणत्या देशात जात असतात आणि तेथील निसर्गाचा आनंद घेतात. यासोबतच ते त्यांच्या या भेटीचे फोटो, माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. अभिनेत्री काजोल जितकी तिच्या चित्रपटांसाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बबली स्वभावासाठी ओळखली जाते. काजोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. आपण भलं आणि आपलं काम भलं अशी काजोल सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.
नुकताच काजोलने एक मस्त आणि आकर्षक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे काजोल मोठया प्रमाणात लाईमलाइटमध्ये आली असून, काजोल आणि काजोलचा हा फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. सध्या काजोल मॉस्कोमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच ट्रिपचा एक फोटो तिने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, हा फोटो आणि त्याचे कॅप्शन सध्या खूप चर्चेत आले आहे.
काजोलने शेअर केलेल्या फोटोमध्ये किंबहुना तिच्या या सेल्फीमध्ये तिच्या ग्लो करणाऱ्या चेहऱ्यासोबतच तिच्या मागे दिसणाऱ्या मॉस्कोमधील इमारतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो बघताना काजोल डिजनी लँडमध्ये आहे की, काय असेच आपल्याला वाटेल. मात्र काजोलच्या मागे असणाऱ्या या इमारती मॉस्कोमधल्या आहेत. हा फोट शेअर करताना काजोलने लिहिले, “नाही हा सेट नाही, नॅचरल आहे.” काजोलच्या मागे दिसणाऱ्या रंगबेरंगी इमारती आणि पुढे असणाऱ्या काजोलचा हा फोटो अमाप लोकप्रिय होत आहे. मोकळे केस, लाल लिपस्टिक, टर्टल नेकचा व्हाईट रंगाचा स्वेटशर्ट घातलेली काजोल चांगलाच भाव खाऊन जात आहे.
काही दिवसांपूर्वीच काजोलचा सुपरहिट सिनेमा असणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेला २६ वर्ष पूर्ण झाले आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या या सिनेमाने इतिहास रचला होता. या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काजोलने शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कारण एकीकडे शाहरुख खान त्याच्या मुलामुळे कायदेशीर कारवाईमध्ये अडकलेला असताना काजोलची ही आनंददायी पोस्ट काहींना न आवडल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला
–गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके
–सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…