बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लूकबद्दल खूप सिरियस असतात. कुठेही जायचे म्हटले तरी त्यांच्या आजूबाजूला नेहमीच त्यांच्या चाहत्यांचा घोळका असतो. यात त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता दिसली की, त्यांना लगेच ट्रोल केले जाते. त्यामुळे त्यांना नेहमीच त्यांच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बऱ्याचवेळा त्याच्या फॅशनचे कौतुक होते तर अनेकदा त्यांना ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागते. असेच काहीसे अभिनेत्री काजोलसोबत झाले आहे. ‘फिल्म फेअर मिडील इस्ट अचिवर्स अवॉर्ड नाईटस’च्या वेळी काजोल असा ड्रेस घालून आली ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दुबईमध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार देखील तिथे हजर होते. यात काजोल, उर्वशी रौतेला, श्रुती हासन, ऊर्फी जावेद यांसारखे बरेच कलाकार होते. यावेळी प्रत्येकाचा ग्लॅमरस लूक बघण्यासारखा होता. परंतु या सगळ्यात काजोलचा ड्रेस सगळ्यांचे आकर्षण बनला होता. तिने ब्लॅक अँड व्हाईट बॉडी-कॉन सुपर पंल्गिंग गाऊन घातला होता. (Kajol trolled for her thigh slit how. Netizens wearing an envelope or bike cover)
या ड्रेसला साजेसा असा मेकअप केला होता. तिने न्यूड कलरची लिपस्टिक लावली होता. तसेच शिमरी आयशॅडो करून हा लूक पूर्ण केला होता. नेहमीच चाहत्यांकडून कौतुक होणाऱ्या काजोलला या वेळेस मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तिचा हा अवतार अजिबात आवडला नाही आणि ते सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
काजोलच्या या ड्रेसचा गळा एवढा मोठा आहे की, लोकांनी तिच्या या ड्रेसची तुलना बाईकच्या कव्हरसोबत केली आहे. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, “उर्फीचा आजार चढला काय तुला?” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “हे काय चादर घेऊन आलीये, अवॉर्ड मिळाला नाही तर तिथेच झोप.” यासोबात आणखी एकाने कमेंट केली आहे की, “प्लीज पुढच्या वेळेस हॉलिवूड स्टाईल कॉपी करू नको, तू इंडियन लूकमध्येच छान दिसते.” तिचा हा लूक अनेकांना आवडला नाही.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती या आधी शेवटाची तन्वी आजमी आणि मिथिला पालकरसोबत ‘त्रिभंगा’ या वेबसीरिजमध्ये दिसली आहे. ती धनुषसोबत ‘वेलैइला पट्टाधरी ३’ आणि शाहरुख खानसोबत राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सेट नाही नैसर्गिक ब्युटी’, म्हणत काजोलने शेअर केला तिचा आकर्षक फोटो