Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड केआरकेने उडवली ‘सम्राट पृथ्वीराज’ची खिल्ली; थिएटरचा फोटो शेअर करत म्हणाला, ‘अक्षयला लाज…’

केआरकेने उडवली ‘सम्राट पृथ्वीराज’ची खिल्ली; थिएटरचा फोटो शेअर करत म्हणाला, ‘अक्षयला लाज…’

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ रिलीझ झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्यासोबत मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) दिसत आहे. या चित्रपटात अक्षय सम्राट पृथ्वीराजची भूमिका साकारत असून, चाहत्यांना अभिनेत्याचे काम खूप आवडले आहे. सोशल मीडियावरही लोक ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या सगळ्यात कमाल आर खानची (KRK) या चित्रपटावरची प्रतिक्रिया समोर आली आहे. केआरकेच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाचे शो रिकामे आहेत.

केआरकेने एकाच वेळी अनेक ट्वीट केले, ज्यात त्याने सांगितले की, चित्रपटगृह रिकामे आहेत. अक्षय कुमारचा हा चित्रपट बघायला लोक जात नाहीयेत. त्याने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “पृथ्वीराजचा पहिला शो सुरू झाला आहे आणि मी थिएटरमध्ये आहे. प्रोपौगंडा ओव्हरसीज मार्केटमध्ये काम करत नाही.” या ट्वीटसह कमाल आर खानने एक फोटोही शेअर केला, जो चित्रपटगृहाचा असून या चित्रपटगृहातील सर्व सीट रिकाम्या आहेत. (kamaal r khan react akshay kumar film samrat prithviraj)

कमाल आर खानने पुढच्या ट्वीमध्ये लिहिले की, “अक्षय कुमारला असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे. ज्यात त्याला भावाच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तिचे अपहरण करायचे होते. भावाची मुलगी स्वतःच्या मुलीसारखी असते. मुलगी वडिलांचा आदर करत नाही. हा एक घाणेरडा चित्रपट आहे.” तो इथेच थांबला नाही. तो ट्वीटमध्ये असेही म्हटला की, “चित्रपटावर तर हसालच, पण पृथ्वीराजच्या मृत्यूवरही हसाल. इतका अप्रतिम विनोदी चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शकाला सलाम. ”

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय सोनू सूद (Sonu Sood) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास ३०० कोटी आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बंपर कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण तसे झाले नाही. पहिल्याच दिवशी हा चित्रपट १४-१५ कोटींचा आकडा गाठेल, असा दावा केला जात होता. पण चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे १०.५० कोटींची कमाई केली आहे, ही निर्मात्यांसाठी त्रासदायक बातमी आहे.

 

हे देखील वाचा