Thursday, July 18, 2024

सकाळी अटक, संध्याकाळी थेट दवाखान्यात! बॉलिवूड अभिनेत्याबद्दल मोठी बातमी आली समोर

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान(Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याला वादग्रस्त ट्विट पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. असच एक वक्तव्य त्याला चांगलंच महागात पडलं आहे. वृत्तानुसार, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर केआरकेला मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी आज सकाळी विमानतळावरून अटक केली.

माध्यमाच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केआरकेला आज सकाळी दुबईहून आल्यानंतर मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला बोरिवली येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी चार दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

केआरके विरुद्ध 2020 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (दंगल भडकवण्याच्या उद्देशाने भडकावणे) आणि 500 ​​(बदनामीची शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी केआरकेविरोधात पहिले ‘लूकआउट सर्क्युलर’ही जारी करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे, 2020 मध्ये केआरकेने बॉलिवूडचे दोन दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात, केआरकेच्या वतीने, त्याच्या वकिलाने आज जामिनासाठी अर्ज केला, ज्यावर आता 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

केआरके अर्थातच कमाल राशिद खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं, ज्याचा परिणाम म्हणून आता त्याला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याने 2020 मध्ये एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करत भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी केआरकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अभिनेत्याला अटक झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा
सव्वाशे कोटीत बनलेल्या ‘लायगर’ने धड 50 कोटीही नाही छापले, थिएटरमधील प्रेक्षकसंख्या पाहून भावूक झाला विजय

हे देखील वाचा