Friday, July 5, 2024

कमाल अमरोहींचा ड्रीम प्रोजेक्ट होता ‘रझिया सुलतान’, करोडोंचे बजेट असूनही का जोरात आपटला ऐतिहासिक चित्रपट?

कमाल अमरोही (Kamal Amrohi) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे नाव आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले. ‘पाकीजा’, ‘महल’ आणि ‘रझिया सुलतान’ हे त्यांचे सर्वात अविस्मरणीय चित्रपट आहेत. ‘रझिया सुलतान’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, जो एका ऐतिहासिक विषयावर बनला होता. कमाल साहेबांचा हा चित्रपट त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या दिग्दर्शकांनी ऐतिहासिक विषयांवर चित्रपट बनवले आहेत. ‘मुगले आझम’, ‘जोधा अकबर’, ‘अशोका’, ‘पद्मावत’ या चित्रपटांची नावे या चित्रपटांमध्ये येतात. १९८३ मध्ये ‘रझिया सुलतान’ ज्या भव्य पद्धतीने बनवण्यात आला होती, ती कमाल अमरोही यांची कमाल मानली जाते. (kamal amrohi dream project razia sultan flop on box office)

ऐतिहासिक विषयाचे गांभीर्य समजून, कमाल अमरोही यांनी चार ते पाच कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘रझिया सुलतान’ला बनवले. चित्रपटाला हिट करण्यासाठी कमाल अमरोही यांनी सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) आणि चित्रपटसृष्टीची ड्रीमगर्ल म्हटल्या जाणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुख्य भूमिकांसाठी निवड केली.

कमाल अमरोही यांनी ‘रझिया सुलतान’ चित्रपटात त्या सर्व गोष्टींचा समावेश केल, ज्यामुळे चित्रपट यशस्वी होऊ शकेल. जसे की चांगली स्टारकास्ट, कथा, चांगले संगीत, चांगले दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण इत्यादी सर्व काही. पण या सगळ्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रझिया सुलतान’ केवळ दोन कोटींचा व्यवसाय करू शकला.

का चालला नाही चित्रपट?
त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाल्याची अनेक अटकळ बांधली जात होती. काही लोक म्हणाले, की चित्रपटात उर्दूचा उच्च स्तराचा समावेश आहे. खूप जड उर्दू संवाद समाजातील एका मोठ्या वर्गाच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे हा चित्रपट चालू शकला नाही. चित्रपटाच्या एका सीनमध्ये एक वृद्ध स्त्री न्यायासाठी इल्तुतमिशकडे येते, तेव्हा त्या महिलेच्या हाकेवर इल्तुतमिश ‘लबबॅक’ म्हणतो, आता ‘लॅबबॅक’चा अर्थ किती प्रेक्षकांना कळेल? चित्रपटात अशा प्रकारच्या संवादांची कमतरता नव्हती. त्यामुळे कमाल यांचा ‘रझिया सुलतान’ बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा