Sunday, September 8, 2024
Home टॉलीवूड त्यावेळी बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये बरेच कनेक्शन होते! कमल हसन यांनी सांगितले बॉलिवूड सोडण्याचे कारण…

त्यावेळी बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये बरेच कनेक्शन होते! कमल हसन यांनी सांगितले बॉलिवूड सोडण्याचे कारण…

कमल हसन यांचा समावेश देशातील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्यांमध्ये होतो. सहा दशकांपासून ते आपल्या अष्टपैलू प्रतिभेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. देशातच नाही तर परदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले होते. परंतु त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांचा बॉलीवूडमधील वावर कमी होत गेला.

२०१७ साली एका मुलाखतीदरम्यान कमल यांनी बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले होते. ते म्हणाले की, त्यावेळी बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये बरेच कनेक्शन होते. मला  तेथे राहून अंडरवर्ल्डच्या निषेधाला किंवा त्यांच्या धमक्यांना बळी पडायचे नव्हते. काळ्या पैशाशी माझा काहीही संबंध नाही, असे मानणाऱ्या अभिनेत्यांपैकी मी एक आहे, असे कमल यांनी त्यावेळी म्हटले होते.

यावेळी त्यांना जेव्हा विचारण्यात आले की, भ्रष्टाचाराशिवाय एखाद्या अभिनेत्याला मोठे यश मिळवणे शक्य आहे का, तेव्हा ते म्हणाले, होय, मी याचा जिवंत पुरावा आहे. नुकताच कमल यांचा इंडियन 2 हा चित्रपट येऊन गेला. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बनला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कमल हसन सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. ते लवकरच इंडियन 3 मध्ये दिसणार आहेत. तसेच त्यांच्याकडे ‘ठग लाईफ’ हा चित्रपट देखील आहे. चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

मी अभिनेत्री आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही ! पापाराझींच्या विरोधात तपासीचे रोखठोक वक्तव्य…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा