Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

Vikram Movie :चित्रपटाची कमाई तर जबरदस्तच, पण कलाकारांच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन (Kamal Hasan) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट विक्रम चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार हिट ठरत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, विक्रमने आतापर्यंत एकूण 123 कोटींहून अधिक कमाई केली आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटात अनेक दमदार अभिनेत्यांनी काम केले आहे. या स्टार्सनी विक्रमसाठी भरघोस फी देखील घेतली आहे. चित्रपटाची कमाई जितकी जबरदस्त आहे तितकेच चित्रपटातील कलाकारांचे मानधनही मोठे आहे. पाहूया चित्रपटासाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले आहे.

कमल हासन – 
कमल हासनची यांचे नाव दाक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत घेतले जाते. सध्या त्यांचा विक्रम चित्रपट सुपहीट ठरत आहे.   या चित्रपटाद्वारे ते तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी  या चित्रपटासाठी मोठी रक्कम फी म्हणून घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमल हसन यांनी  विक्रम या चित्रपटासाठी 40 कोटी रुपये घेतले आहेत.

विजय सेतुपती – 
विजय सेतुपती यांची लोकप्रियता दक्षिणेसह हिंदी भाषिक राज्यांमध्येही आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटासाठी त्यांना  मोठी रक्कमही देण्यात आली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी निर्मात्यांनी त्याला 10 कोटी रुपये दिले आहेत.

फहाद फासिल – 
अभिनेता फहाद फासिल हा दक्षिणेतील जबरदस्त कलाकारांपैकी एक आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राइज या चित्रपटामुळे तो उत्तर भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे. विक्रम या चित्रपटातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटासाठी त्याने 4 कोटी रुपये घेतले आहेत.

https://www.instagram.com/p/CeX8YP5pgvL/?utm_source=ig_web_copy_link

लोकेश कानगराज – 
लोकेश कनगराज हा फिल्म मास्टर, कैथी आणि मनाराम सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने  विक्रमचे दिग्दर्शनही उत्तम केले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटासाठी त्याने 8 कोटी रुपये घेतले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा