Saturday, July 6, 2024

‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी संपवले होते स्वत:चेच कुटुंब, पत्नी अन् मुलीला गोळी मारून केली आत्महत्या

बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत १९९२मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून पदार्पण केलेला अभिनेता कमल सदाना हा इंडस्ट्रीमधून आता गायबच झाला आहे. त्याचा जन्म २१ ऑक्टोबर, १९७० रोजी झाला होता. त्याने काही मोजक्याच चित्रपटात काम केले. कारण, तो प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा निर्माण करू शकला नाही. एकापाठोपाठ त्याचे चित्रपट हे फ्लॉप झाले. म्हणून तो इंडस्ट्रीपासून लांब गेला. परंतु तुम्हाला माहिती आहे का?, कमल सदानाचा २० वा वाढदिवस त्याच्या आयुष्यात वादळ घेऊन आला होता.

कमल सदानाचा विसाव्या वाढदिवसामुळे आयुष्य पूर्णपणे विचलित झाले होते. या पाठीमागे त्याच्या वडिलांचा हात होता. २१ ऑक्टोबर, १९९० रोजी तो आपला वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त होता. तेवढ्यात त्याचे वडील ब्रिज सदानाने पत्नी सईदा खान आणि मुलगी नम्रता यांना गोळी मारून त्यांची हत्या केली होती. तसेच त्याच्या वडिलांनी कमल यांच्यावर देखील गोळी चालवली, पण ती गोळी त्यांच्या कानाजवळून गेली, त्यामुळे ते त्यादिवशी वाचले होते.

मुलीची आणि बायकोची हत्त्या करून वडिलांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या करून घेतली. काही क्षणातच कमल याचे परिवार संपले. त्याच्या डोळ्यासमोर ही घटना घडली होती. त्यामुळे त्याच्या डोक्यावर त्यावेळी जरा जास्तच परिणाम झाला होता. नंतर त्याचे समुपदेशन करावे लागले होते. मात्र, आजही हा किस्सा आठवला, तरीही तो हेच म्हणतो की, “मला माहिती नाही माझ्या वडिलांनी असे का केले.”

https://www.instagram.com/p/CQRAGCcJBRj/?utm_source=ig_web_copy_link

माध्यमांतील वृत्तांनुसार, कमलची आई आणि वडील ब्रिज यांचे सतत भांडण होत असायचे, असे सांगितले जाते की, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याचे वडील हे दारूच्या नशेत आणि खूप रागात होते. रागाच्या भरात त्यांनी आपली लायसन्सवाली बंदूक काढली आणि आधी आपल्या पत्नीला नंतर आपल्या मुलीवर गोळी मारली होती. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

कमल सदानाने आतापर्यंत ‘निर्णायक’, ‘फौज’, ‘हम सब चोर है’, ‘हम हैं प्रेमी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा