Friday, July 5, 2024

पाणीपुरीच्या स्टॉलवर काम्या पंजाबी विसरली होती एक लाख रुपयांची रोख रक्कम

आजच्या काळात सर्वांनाच प्रत्येक गोष्टीची घाई असते. घाईघाई करण्यामध्ये अनेक आपण कोणती वस्तू कुठे ठेवतो हे विसरतो, तर एखादी गोष्टी बाहेर विसरून येतो. याची काहींना मोठी किंमत देखील चुकवावी लागते. जर तुम्हाला कोणी १ लाख रुपयांचा चेक दिला आणि तो चेक तुम्ही पाणीपुरीच्या स्टॉलवर विसरून आला तर? कल्पना देखील सहन होत नाही ना. आपल्या सामान्य लोकांसाठी १ लाख ही अतिशय मोठी स्वप्नवत रक्कम आहे. मात्र असेच काहीसे घडले आहे टीव्ही अभिनेत्री असलेल्या काम्या पंजाबीसोबत. काम्या तिला मिळालेला १ लाखाचा चेक चक्क पाणीपुरीच्या गाड्यावर विसरली. तिला तो चेक मिळाला की नाही चला तर जाणून घेऊया.

एका मुलाखतीदरम्यान काम्याने तिच्यासोबत झालेल्या या प्रसंगाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदोरला गेली होती. तिथून घरी येताना मला माझ्या मॅनेजरने सांगितले की, इथे कुठे छपन्न दुकान नावाचे एक दुकान आहे जिथली पाणीपुरी खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तसेही इंदोर चाट साठी खूपच प्रसिद्ध आहे. मी माझ्या मॅनेजरच्या आग्रहाला नकार देऊ शकली नाही. माझ्याजवळ एक पाकीट होते ज्यात एक लाख रुपयांची रोख रक्कम होती. खाताना मी ते पाकीट टेबलवर ठेवले आणि पाणीपुरी खायच्या, फोटो काढायच्या नादात मी इतकी गुंतली की ते पाकीट तिथेच सोडून माझ्या हॉटेलवर आली.”

पुढे काम्याने सांगितले की, “मी हॉटेलवर आली आणि मग माझ्या लक्षात आले की माझ्याकडे एक लक्ष रुपये असलेले पाकीट नाहीये. थोडा विचार केल्यावर लक्षात आले की मी ते पाकीट पाणीपुरीच्या स्टॉलवर ठेवले होते आणि तिथेच विसरून आली आहे. मी लगेच माझ्या मॅनेजरला सांगितले. तो देखील लगेच पळाला. मी इकडे टेन्शनमध्ये होते आणि प्रार्थना करी होते की, ते पाकीट मिळून जावे. माझा मॅनेजर त्या स्टॉलवर पोहचला आणि त्याला ते पाकीट तिथेच मिळाले जिथे मी ठेवले होते. खरं सांगायचे तर मी आशा सोडून दिली होती. मात्र इंदोरचे लोकं खूपच चांगले आणि दयाळू आहेत.”

काम्या पंजाबी हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. काम्याने टीव्हीमध्ये अनेक चांगल्या भूमिका सकाकारात स्वतःला सिद्ध केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

हे देखील वाचा