Friday, July 5, 2024

‘माझ्या मुलीबद्दल बोलणाऱ्या लोकांचा मी गळाच कापला असता’, काम्या पंजाबीने सांगितला तिचा ट्रोलिंगचा अनुभव

सोशल मीडियाचे अनेक फायदे आणि तोटे असतील मात्र या सोशल मीडियाचा सर्वात मोठा तोटा किंबहुना दुष्परिणाम म्हणजे ट्रोलिंग. सध्या ट्रोलिंगचे प्रमाण खूपच वाढले असून या ट्रोलिंगचा सर्वात जास्त सामना कलाकरांना करावा लागतो. कलाकार हे समाजाचे एक आयकॉन असतात. त्यांना अनेक जणं आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे वागतात. कलाकरांवर सतत लोकांचे लक्ष आणि मीडियाचे कॅमेरे रोखलेले असतात, लोकांना न आवडणाऱ्या कृती जर या लोकांकडून घडल्या तर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगचा सामना मोठ्यातमोठ्या कलाकारांपासून लहानातलहान कलाकारांपर्यंत कोणीच यातून सुटले नाहीये.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या काम्या पंजाबीने नुकताच तिचा ट्रोलिंगचा अनुभव सांगितला. काम्या जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या ‘लेडीज वर्सेस जेंटलमॅन २’ मध्ये पोहचली होती. यावेळी तिने अनेक गोष्टींबद्दल तिचे मत मांडले. २०२० मध्ये काम्याने दिल्लीमधील डॉक्टर शलभ दांगसोबत लग्न केले. हे तिचे दुसरे लग्न आहे. तिचा पहिला घटस्फोट झाल्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. याशिवाय तिला तिच्या मुलीवरून देखील ट्रोल केले गेले. याचा अनुभव तिने या शोमध्ये सांगितला.

यावेळी ती म्हणाली की, “माझे पहिले लग्न तुटले होते. त्या लग्नात मी काही सहन केले. त्या लग्नात मी घरगुती हिंसाचाराला बाली पडली होती. जेव्हा मी त्या लग्नातून बाहेर पडले, तेव्हा मला लोकांनी खूप ट्रोल केले. त्यानंतर मी एका रिलेशनशिपमध्ये होते तिथे देखील मला ट्रोल केले गेले. मला सांगितले जायचे की, तू म्हतारी झाली आहेस. तुझा घटस्फोट झाला असून, हा तुला सोडणार आहे. तू तुझी मुलगी विकून टाकशील.”

पुढे काम्या म्हणाली की, “तेव्हा माझी पाच वर्षाची मुलगी होती आता ती अकरा वर्षाची झाली आहे. तेव्हा तिला ट्रोल केले गेले. मी काय कपडे घालते, ती माझी इच्छा आहे. माझे शरीर आहे, माझी इच्छा आहे. कितीपण भुंकू मला अजिबात फरक पडत नाही. हे जेव्हा माझ्यापर्यंत होते तेव्हा ठीक होते, मात्र जेव्हा माझ्या मुलीवर गेले तेव्हा मी सहन केले नाही. मला असे वाटायचे की, जे माझ्या मुलीबद्दल असे बोलत आहे, त्यांचा मी गळा कापावा.”

काम्याने २००३ मध्ये बंटी नेगीसोबत लग्न केले. मात्र या लग्नात ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली. तिने खूप सहन केले, मात्र डोक्यावरून पाणी जायला लागल्यावर तिने २०१३ साली तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर ती टीव्ही अभिनेता असणाऱ्या करण पटेलसोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा