Saturday, July 6, 2024

‘दुसऱ्याला पण घटस्फोट देणार’, ट्रोलरच्या कमेंटवर टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचे सणसणीत प्रत्युत्तर

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रतिभावान आणि बेधडक व्यक्तव्य करणारी अभिनेत्री म्हणजे काम्या पंजाबी. काम्याने तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काम्या जेवढी तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते तेवढीच किंबहुना त्याहून अधिक ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाइमलाईट्मधे येते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी काम्या नेहमीच तिचे आणि कुटुंबाचे फोटो पोस्ट करताना दिसते. फॅन्स देखील तिच्या फोटोंवर कमेंट्स करत तिचे कौतुक करत असतात. मात्र कौतुक करण्यासोबत काही नेटकरी तिला ट्रोल देखील करतात. अशा लोकांना काम्या सडेतोड उत्तर सुद्धा देते.

नुकतेच एका नेटकाऱ्याने सोशल मीडियावर काम्याला टार्गेट करत तिच्या दुसऱ्या घटस्फोटावर व्यक्तव्य केले. त्यानंतर काम्याने त्याला चांगलेच फटकारले. ट्विटरवर एका युजरने काम्याच्या दुसऱ्या नवऱ्याला घटस्फोट देण्याबाबत एक कमेंट केली. त्याने त्याच्या कमेंटमध्ये लिहिले, “इतिहास पुन्हा एकदा घडतो. कारण तू लवकरच दुसऱ्या नवऱ्याला देखील घटस्फोट देशील. घटस्फोटित स्त्रिया कधीच शांत बसत नाही.” या ट्विटनंतर कमाईने त्याला जे उत्तर दिले ते वाचून त्या युजरने त्याचे ट्विटच डिलीट करून टाकले.

काम्याने त्याच्या ट्विटला सणसणीत उत्तर देताना लिहिले, “अजून काही बोलायचे आहे का तुला? तुझे घाणेरडे डोके दुसरेकडे घेऊन जा. तुम्हा लोकांना माहीतही नाही की, मी कशाबद्दल बोलते. मात्र तुम्हाला तुमच्यात असणारा घाणेरडेपणा सगळीकडे पसरवायचा आहे. श्वास घे, पाणी पी आणि तुझ्या आईला सांग तुला थोड्या चांगल्या सवयी शिकवायला.”

तत्पूर्वी काम्या पंजाबीने २००३ साली बंटी नेगीसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. तिला आणि बंटीला एक मुलगी आहे. पुढे २०२० साली तिने उद्योगपती शलभ डांगसोबत दुसरे लग्न केले. त्याचे देखील हे दुसरे लग्न असून त्याला एक मुलगा आहे. हे दोघं त्यांच्या लग्नात खूपच खुश असून, सोहळा मीडियावर सतत फोटो शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा