बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणोत मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र शासनावर केलेल्या टीकांमुळे चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाचं नाव न घेता हिमाचल प्रदेशला गांज्याची शेती करणारा राज्य म्हटले होते. यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. यासोबतच तिने उद्धव ठाकरे यांना तुच्छ व्यक्तीही म्हटले आहे.
झाले असे की, रविवारी दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी कंगना रणोतचं नाव न घेता म्हटले होते की, ‘मुंबई पाकिस्तान आहे, इथे प्रत्येक ठिकाणी ड्रग्स घेणारे लोक आहेत. अशाच प्रकारची प्रतिमा त्यांना बनवायची आहे. त्यांना माहिती नाही की, आम्ही आमच्या घरात तुळस उगवतो, गांजा नाही. गांज्याची शेती तुमच्या राज्यात आहे. महाराष्ट्रात नाही.’
उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाचा उल्लेख करत कंगनाने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले की, “मुख्यमंत्री तुम्ही खूप तुच्छ व्यक्ती आहात. हिमाचलला देवांची भूमी म्हटले जाते. इथे अधिक संख्येनं मंदिरं आहेत आणि गुन्हेगारी दर शून्य आहे. हो, येथील जमीन खूप सुपीक आहे, त्यात सफरचंद, किवी, डाळिंब आणि स्ट्रॉबेरी तयार होतात, येथे काहीही पिकवता येते.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1320571848233340928
https://twitter.com/KanganaTeam/status/1320573000387706880
तिने पुढे लिहिले की, “तुम्हाला स्वत:ला लाज वाटली पाहिजे, जनतेचे सेवक असूनही तुम्ही असल्या तुच्छ भांडणात सामील आहात. तुम्ही आपल्या ताकतीचा वापर संमती न दर्शवणाऱ्या लोकांच्या अपमान आणि नुकसानीसाठी करत आहात. वाईट राजकारण करून तुम्ही जे स्थान मिळवले आहे, तुम्ही त्याच्या लायकीचे नाहीत. लाजिरवाणी बाब आहे.”